तालुका प्रतिनिधी, वणी: कोरोना संसर्गामुळे सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहे. परिणामी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास सुरू आहे. कृषी महाविद्यालयाचे चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम आणि शेतीवर आधारित व्यवसायांशी संलग्नता उपक्रम स्थानिक पातळीवर राबवित आहे. यामाध्यमातून कृषिचे विद्यार्थी कृषीवर आधारित व्यवसायाचे धडे गिरवित आहे.
वणी तालुक्यातील पिंपरी (कायर) येथील सुरेश विजय बांदूरकर हा विद्यार्थी अमरावती जिल्ह्यातील पिंपळखुटा येथील श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालयात कृषी विज्ञान शाखेत अंतिम वर्षाला शिकत आहे. तो कायर येथील साई श्रद्धा कृषी केंद्रात व्यवसायिक प्रशिक्षण घेत आहेत. त्याचा प्रशिक्षण कालावधी दहा आठवड्याचा आहे. यासाठी त्याला कृषी केंद्र संचालक सुहास लांडे, महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रशांत सेलोकर, प्राचार्य डॉ. शरद नाईक आणि इतर प्राध्यापक वृंदाचे मार्गदर्शन मिळाले.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)