शिक्षक संजय पुनवटकर यांचे नागपुरात निधन

शिंदोल्याच्या आदर्श विद्यालयात होते कार्यरत

0

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील शिंदोला येथील आदर्श विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक संजय पुरुषोत्तम पुनवटकर (52) यांचे दि. 21 सोमवारला सायंकाळी अल्पशा आजाराने नागपूरला निधन झाले. त्यांचे मुळगाव वनोजादेवी होते. प्रकृती अस्वस्थ असल्याने त्याना 16 तारखेला नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तिथेच उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. नागपूर येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांच्या मागे वडील, भाऊ राजेश, पत्नी, मुलगा, मुलगी आणि बराचसा आप्त परिवार आहे.  विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. ते अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या गुणांमुळे त्यांच्या चाहत्यांमध्येही ते प्रिय होते. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.