मेंढोली, बोरगावचा वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

त्रस्त ग्राहकांनी दिला आंदोलनाचा इशारा

0

विवेक पिदूरकर, शिरपूर: मेंढोली आणि बोरगाव या दोन्ही गावातील घरगुती वीज पुरवठा अनेक दिवसांपासून खंडित होत असतो. खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्वरित वीज पुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिरपूर वीज वितरण कार्यालय प्रमुखांना निवेदनाद्वारे दिला आहे.

वणी तालुक्यातील मेंढोली आणि शिरपूर गावातील वीज पुरवठा सतत खंडित होत असतो. परिणामी पावसाच्या दिवसांत ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना माहिती देऊनही वीज दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी ग्रामस्थांशी अरेरावीची भाषा वापरतात, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.

याबाबत दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी सहाय्यक अभियंता यांना निवेदन सादर केले आहे. निवेदन देताना बोरगावचे सरपंच भारत गेडाम, उपसरपंच श्रीकृष्ण महाकुलकर, सुधाकर तुराणकर, मेंढोलीचे दीपक बलकी, राजू तुराणकर, सारंग डवरे, उदय एकरे आदी उपस्थित होते.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.