चोरींवरचे सुटले कंट्रोल, गायब होत आहे पेट्रोल 

 मुकुटबन व परिसरात पेट्रोल व इतर चोऱ्यात प्रचंड वाढ

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन,मांगली व परिसरात लहान मोठ्या चोरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने जनतेत दहशीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातही गाड्यांमधील पेट्रोलचोरींचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या चोरींवरचे कंट्रोल सुटले काय, असा प्रश्न निर्माण हेत आहे.

मुकुटबन येथील वॉर्ड क्रं ४ मधील रहिवासी दयाकर येनगंटीवार यांच्या घराच्या वॉल कंपाउंडमध्ये ठेवलेल्या दुचाकीतील पेट्रोल काही तरुण काढत होते. दयाकर यांची झोप उघडली व दरवाजा उघडून बाहेर आले . दयाकर यांना दोन तरुण दुचाकीजवळून पळून गेले यावरून शंका आली, दुचाकीजवळ जाऊन बघितले असता दुचाकीच्या टॅंकला पाईप लावून प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पेट्रोल काढत होते.

सकाळी घडलेली घटना नातेवाईक व मित्र मंडळींना सांगितली. यापूर्वीसुद्धा दयाकर यांच्या आवारातील चार्जिंगला लावलेले फवारणीचे मोटरपम्पसुद्धा चोरी सांगीतले. तसेच गावातील अनेक घरांतील पाण्याच्या मोटारी, केबल व लहान मोठ्या वस्तूंच्या चोरीत प्रचंड वाढ झाली आहे. लहान वस्तू चोरी गेल्याने जनतेनी पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या नाहीत. परंतु गेल्या एक वर्षांपासून अशा प्रकारच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

बसस्टँड चौकातील मुख्य मार्गावरील २ पानटपरी, हॉटेल वगैरे दुकाने फोडण्यात आलीत. किराणा दुकानातून रोख ८५ हजार रुपयांची चोरी झाली.अशा अनेक चोरींच्या घटनेत वाढ झाली आहे. या चोरीमागे भुरटे चोर असल्याची शंका वर्तविली जात आहे. मुकुटबन व परिसरातील दुचाकी चोरीतही वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी मांगली येथे रात्री भुरटे चोर चोरीच्या बेतात होते. गावकऱ्यांच्या सतर्कतेने चोर पळून गेलेत.

चोरीच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. यापूर्वी रात्री जीप घेऊन पोलिसांची गस्त ड्युटी होती. चारचाकीने सायरन वाजवत मुकुटबन व परिसरात पोलिसांची गस्त होती, अलीकडे एक वर्षापासून पोलिसांची गस्त ड्युटी बंद झाल्याने चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तरी पोलिसांनी चोरीच्या घटनेंचा छडा त्वरित लावावा. तसेच नाईटगस्त ड्युटी सुरू करावी अशी मागणी होत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.