रोहित राऊत यांची जिल्हा समन्वयकपदी निवड
महाराष्ट्र किसान काँग्रेसचा जिल्ह्याचा सांभाळतील पदभार
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अहेअल्ली येथील तडपदार युवक काँगेस कार्यकर्ता रोहित राऊत यांची निवड झाली. ते महाराष्ट्र किसान काँग्रेसच्या यवतमाळ जिल्ह्याचे समन्वयक म्हणून काम पाहतील. राष्ट्रीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र किसान काँग्रेसने रोहित यांची निवड केली आहे. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सुरेंदर सोलंकी यांनी नियुक्तीपत्र दिले.
आदिवासीबहुल झरी तालुक्यातील अहेअल्ली हे छोटंसं गाव. या परिसरातून त्यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय कारकीर्दीला आरंभ केला. चिकाटी आणि परिश्रम हा त्यांचा गुण आहे. एखादा विषय तडीस नेल्याशिवाय ते हार मानत नाहीत. दिलेला शब्द पाळण्यासाठी ते विख्यात आहेत.
रोहित राऊत यांची निष्ठावान आणि धडाडीचा कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. त्यांचा प्रचंड लोकसंग्रह आहे. ते नियमित जनतेच्या संपर्कात असतात. मृदू आणि विनम्र संभाषणाने समन्वय साधण्याची त्यांची हातोटी आहे. रोहित राऊत यांच्या निवडीने तालुक्यातील काँगेस व युवक काँगेसमध्ये आनंदमय वातावरण झाले. जिल्ह्यासह तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)