शाळा बंद तरी खर्चाचे मीटर सुरू

पालकांची शाळांना सहकार्याची हाक

0

जब्बार चीनी,वणी: शाळा बंद असल्यात तरीह पाल्यांच्या शैक्षणिक खर्चांचे मीटर सुरूच आहे. कोरोनाच्या काळात अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्यात. छोटे-छोटे व्यवसाय बंद पडलेत. त्यामुळे शहरातील शाळा चालकांनी पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता जेवढ्या सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात येतात तेवढेच शुल्क वसूल करावे, अशी हाक विविध शाळांमधील पालक संघटनांनी दिली आहे.

कोरोनामुळे बाहेर पडण्यास बंधने आलीत. शाळाही उघडण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. मुलांना शाळेत पाठविल्यानंतर त्यांची बैध्दिक, शारीरिक, सांस्कृतिक व सामाजिक अंगांनी उन्नती होत असते. ऑनलाईन क्लासेसमुळे यापैकी एकही गोष्ट साध्य होत नाही.

मुले शाळेत गेल्यास वीज, पाणी, मैदान, उपाहारगृह आणि स्वच्छतागृहाचा वापर करीत होते. ऑनलाईनमुळे यातील एकही वस्तू वापरण्यात येत नाही. शिक्षकही वर्क फ्रॉम होम करीत आहेत. मुलांना ऑनलाईन शिकविल्यानंतर त्यांच्या शंकांचे निरसनही नीट होत नाही.

या परिस्थितीत पालकांनी शाळेचे सर्व शुल्क कोणत्या आधारे द्यावेत, असा सवाल पालक संघटनांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे संस्थाचालकांनी नेमक्या सुविधांचे शुल्क आकारावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

शाळेत पूर्वी व आताच्या मिळणाऱ्या सुविधा

शहरातील शाळांमध्ये कोरोनाच्यापूर्वी वर्षभर सामाजिक क्रियाकलाप, शैक्षणिक सहल, फिल्ड ट्रिप, मेळावे, क्रीडा स्पर्धा, अतिरिक्त अभ्यास, क्रिया छंदवर्ग, वर्गातील उपस्थिती किमान साडेसहा तास, शैक्षणिक कामगिरी व व्यक्तिमत्त्व विकासाकडे शिक्षकांचे लक्ष, प्रत्येक विषयासाठी व विभागासाठी वैयक्तिक शिक्षक, शाळातील ग्रंथालय, संगणक आणि विज्ञान प्रयोगशाळेच्या सुविधा विद्यार्थ्यांना मिळत होत्या. मात्र, सद्य:स्थितीत विद्यार्थ्यांना केवळ तीन तास व्हर्च्युअल वर्ग, एकाच विषयासाठी सर्व विभागांमध्ये एकच शिक्षक आणि केवळ एमसीक्यू टेस्ट होत आहे. त्यामुळे या तुलनेत शाळाचालकांनी शुल्क वसुली करावी, अशी विनंती पालकांनी केली आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.