कृषी कायद्याच्या समर्थनात वणीत आंदोलन

महाआघाडीसरकार विरोधात भाजप आक्रमक

0

जब्बार चीनी, वणी: भारतीय जनता पार्टी वणीच्या वतीने आज बुधवारी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी टिळक चौकात विविध मागणींसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. महाआघाडी सरकार केंद्राच्या निर्णयाची अंमलबजावणी तसेच केंद्र सरकारच्या विविध योजना राज्यात लागू करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सदर आंदोलन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.

मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने दोन्ही सभागृहात कृषी कायदा २०२० बहुमताने पारित केला. सदर कायदा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून या विधेयकाने शेतकऱ्यांची दलालांपासून मुक्तता होणार आहे. याने शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सुद्धा लाभ मिळणार आहे. या विधेयकाने शेतकऱ्यांना एक देश एक बाजारपेठ उपलब्ध होणार. असा दावा भाजपतर्फे करण्यात आला आहे.

महाआघाडी सरकारचे शेतकऱ्यांप्रति प्रेम बेगडी असून सदर विधेयक महाराष्ट्र राज्यात लागू न करण्याचा निर्णय घेत आहे. असा आरोप करत हा निर्णय रद्द करावा व राज्यात कृषी विधेयकाची अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

नवीन कृषी कायदा शेतक-यांच्या हिताचा: आ. बोदकुरवार
केंद्र सरकारचे नवीन कृषी विधेयक हे शेतक-यांच्या फायद्यासाठी आहे. अऩेक वर्षांपासून शेतक-यांची बाजारपेठ खुली करण्याची मागणी होती. एक देश एक बाजारपेठ यानुसार शेतक-यांसाठी आता संपूर्ण देशातील बाजारपेठ खुली होत आहे. हे शेतकर्‍यांच्या हिताचे आहे. शेतकर्‍यांना शेतीमाल व्यापाराचे स्वातंत्र्य सरकार देत आहे. मात्र महाआघाडी सरकार हे विधेयक राज्यात लागू न करून शेतक-यांना आहे त्या परिस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. महाआघाडी सरकारच्या या शेतकरी विरोधी कृतीचा निषेध करावा तितका कमी आहे.
– संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार वणी विधानसभा

यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री रवि बेलूरकर, विजय पिदुरकर माजी जिल्हा उपाध्यक्ष, श्रीकांत पोटदुखे उपाध्यक्ष न.प.वणी तथा भाजपा शहराध्यक्ष वणी, संतोष डंभारे सरचिटणीस वणी शहर, राकेश बुग्गेवार सरचिटणीस वणी शहर, कैलाश पिपराडे सरचिटणीस वणी तालुका, शंकर बांदुरकर सरचिटणीस वणी तालुका, अरुण कावडकर उपाध्यक्ष वणी शहर,

सत्याजित ठाकूरवार सचिव वणी शहर, मुकेश खिरटकर सचिव वणी तालुका, राजेंद्र सिडाम, प्रमोद क्षिरसागर संयोजक सोशल मीडिया सेल वणी विधानसभा, निलेश डवरे, आशिष डंभारे, दीपक पाऊणकर सोशल मीडिया संयोजक वणी तालुका, अक्षय नायगावकर, आशिष जैन, पंकज कासावर, पवन खंडळाकर, रोशन मोहितकर, यांच्या सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.