साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. संतोष डाखरे
शिक्षण, साहित्य आणि समाजातील चतुरस्र व्यक्तिमत्त्व
नागेश रायपुरे, मारेगाव: नजिकच्या मांगरूळ येथून प्रा. डॉ. संतोष डाखरे ह्यांचा प्रवास सुरू झाला. आज त्यांची शिक्षण, साहित्य आणि समाजातील चतुरस्र व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख आहे. ते सध्या राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या विविध क्षेत्रांतील कार्यांची दखल घेत मराठा सेवा संघ प्रणित जगतगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मला पाटील आणि नागपूर विभागीय अध्यक्षा पुष्पा बोंडे यांच्यावतीने राज्यस्तरावरील नवीन नियुत्यांची घोषणा करण्यात आली. ही एक नोंदणिकृत परिषद आहे. परीषदेच्यावतीने जिल्हा, विभाग व प्रदेशस्तरावर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत असते. गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झालेले डॉ. संतोष डाखरे हे विविध वृत्तपत्रांतून सामाजिक, आर्थिक, राजकिय व आंतरराष्ट्रीय विषयांवर अभ्यासपू्र्ण लिखाण करतात.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधे त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरांतून कौतूक होत आहे. आगामी काळात तालुकानिहाय कार्यकारिणीचे गठण करण्यात येणार आहे. त्याकरीता जिल्ह्यातील इच्छुक लेखकांनी 8275291596 या क्रमांकावर संपर्क साधण्याची विनंती करण्यात आली आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)