सुशील ओझा,झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खरबडा येथे अंदाजे ६० हजारांचे साहित्य चोरीला गेले. पंजा सवारीच्या बंगल्यातून संशयित चोरट्याने पंजा सवारीचे साहित्य चोरले. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. अशा पद्धतीची चोरी परिसरात पहिल्यांदाच होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
खरबडा येथून 4 किमी पूर्वेस असलेल्या जब्बार नामक व्यक्तीच्या शेतात सवारीचा बंगला आहे. जब्बार यांच्याकडे पांढरकवडा येथील सलीम म्यार व राहुल कुनघाटकर रा. पांढरकवडा हे सकाळी ११ वाजता आलेत. आम्हाला पंजा सवारीचे दर्शन घ्यायचे असे सांगून सवारीचा शोध घेतला. जब्बार यांच्या शेतातील सवारीच्या बंगल्याचा पूजा केली व पंजा घेऊन जातो असे बोलले.
तिथून ते परत गेलेत. दुसऱ्या दिवशी १३ ऑक्टोबरला शेतात गेले असता बंगल्याचा दरवाजा उघडा दिसला. बंगल्याची पाहणी केली असता सवारीच्या सजावटीचे व पूजेचे संपूर्ण साहित्य चोरी गेल्याचे आढळले. चोरीत पितळी पंजा किंमत 20 हजार व एक किलोचा चांदीचा चंदनहार किंमत 40 हजार असा 60 हजारांचा मुद्देमाल आहे.
एक दिवसापूर्वी सलीम म्यार व राहुल कुनघटकर आले होते. सवारीचे दर्शन घेतो व सवारी घेऊन जातो असे बोलले होते. त्यावरून दोघांवर संशय आला व संशयिता विरोधात विलास हणमंतू सोपरवार रा. खरबडा यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी यावरून कलम 380, 34 नुसार गुन्हा दाखल केला.
पुढील तपास ठाणेदार अमोल बारापात्रे यांसह पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे, जमादार श्यामसुंदर रायके, संदीप सोप्याम, अंजुश वाकडे, अंकुश दरबसतेवार करत आहेत. तर आरोपी शोध मोहिमेकरिता ठाणेदार यांनी दोन पथकं तयार करून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. पथकात वरील अधिकारी, कर्मचारी तसेच होमगार्ड पथकप्रमुख शेख इरफान व आकाश नांनुरवार याचाही समावेश आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)