Lodha Hospital

संजय देरकर यांना कोरोनाची लागण

संपर्कात आलेल्या व्यक्तींनी टेस्ट करण्याची विनंती

0

जब्बार चीनी, वणी: माजी नगराध्यक्ष व वणीतील ज्येष्ठ नेते संजय देरकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज दिनांक 15 ऑक्टोबर रोजी त्यांची कोरोनाची टेस्ट पॉजिटिव्ह आली आहे. त्यांच्यावर सध्या नागपूर येथे उपचार सुरू आहे. गेल्या तीनचार दिवसात संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी ‘वणी बहुगुणी’च्या माध्यमातून केले आहे.

गेल्या दोन तीन दिवसांपासून संजय देरकर यांना अस्वस्थ वाटत होते. काल ताप जाणवल्याने त्यांनी वणीतील एका खासगी रुग्णालयात तपासणी केली. त्यांना कोरोनासदृष्य लक्षणं जाणवत असल्याने डॉक्टरांनी त्यांना नागपूरला जाण्याचा सल्ला दिला. नागपूरला आल्यावर त्यांनी टेस्ट केली असता टेस्ट पॉजिटिव्ह आली. त्यांच्यावर सध्या नागपुरातील सेव्हन स्टार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

Sagar Katpis

संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तपासणी करा: संजय देरकर
सध्या माझी तब्येत ठिक असून काळजी करण्यासारखे कोणतेही कारण नाही. मात्र गेल्या तीन चार दिवसात जे लोक माझ्या संपर्कात आले आहे. त्यांनी खबरदारी म्हणून चाचणी करून घ्यावी. सध्या काही दिवस उपचार घेत असल्याने आपल्या संपर्कात राहता येणार नाही. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:ची काळजी घ्यावी.
– संजय देरकर  

आज तालुक्यात 3 कोरोना पॉजिटिव्ह

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!