अनुदानीत हरभरा बियाणे वाटपाचे आदेश धडकले

'वणी बहुगुणी'च्या बातमीचा दणका, शेतकऱ्यांनी मानले आभार

0

विलास ताजने, वणी:  चंद्रपूर जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी अनुदानीत हरभरा बियाणे प्राप्त झाले होते. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी अनुदानीत हरभरा बियाण्यांपासून वंचित होते. त्यामुळे वणीबहुगुणी न्युज पोर्टलवर ‘एकाला सबसिडी अन् दुसऱ्याला सापशिडी’ शीर्षकाखाली यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी अनुदानीत हरभरा बियाण्यांपासून वंचित म्हणून (दि.18) ऑक्टोबर रविवारी बातमी झळकली होती. यात परमडोहचे सरपंच संदीप थेरे यांनी अनुदानीत हरभरा देण्याची मागणी केली होती.

सदर बातमीची प्रशासनाने दखल घेत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरीता अनुदानीत हरभरा बियाणे वाटपाचे आदेश (दि.20) मंगळवारी जिल्हा व्यवस्थापक महाबीज यवतमाळ यांनी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागाला दिले आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2020 करिता हरभरा फुले विक्रम बियाणे अनुदानावर मिळणार आहे.

यात 20 किलोच्या बॅगचा महाबीज विक्रीदर प्रतिबॅग 1520 रुपये आहे. त्यात 500 रुपये प्रतिबॅग अनुदान रक्कम वगळता शेतकऱ्यांना 1020 रुपये दराने एक बॅग विकत मिळणार आहे. यात एका शेतकऱ्याला 3 बॅग म्हणजे 60 किलो अनुदानीत दराने हरभरा वितरीत होणार आहे. अनुदानीत हरभरा प्राप्त करून घेण्यासाठी 7/12, 8 – अ, आधारकार्डची सत्यप्रत सादर करावी लागणार आहे.

वणी बहुगुणी इम्पॅक्ट
चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी केंद्रातून शेतकरी अनुदानित हरभरा बियाण्यांची खरेदी करीत आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी अनुदानित बियाण्यांपासून वंचित होते. परिणामी परिसरातील शेतक-यांना प्रति किलो 70 ते 90 रुपये दराने खरेदी करावे लागायचे. अनुदानीत हरभरा बियाण्यांची शेतक-यांची मागणी ‘वणीबहुगुणी’ने लावून धरली होती. अखेर दोन दिवसांनी शेतक-यांना अनुदानीत बियाणे मिळणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी ‘वणीबहुगुणी न्युज’ चे आभार मानले.

एकाला सबसिडी अन् दुसऱ्याला सापशिडी!

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.