ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या किशोर मोघे यांचा सत्कार
● जैताई मंदिर समितीने घेतली कामाची दखल
जितेंद्र कोठारी, वणी: ग्रामीण भागात विविध प्रकारची समस्या दूर करणे व गावातील लोकांचे बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने निर्मित ‘ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट’ च्या कामाची जैताई मंदिर समितीने दखल घेतली आहे. मंदिर समिती तर्फे शनिवार दि.24 ऑक्टो. रोजी जळका ता. मारेगाव येथील संस्थेच्या कार्यालयात जाऊन संस्थापक डॉ. किशोर मोघे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ट्रस्टला 5000 रुपयांची देणगीही मंदिर समिती तर्फे देण्यात आली. नवरात्रोत्सव दरम्यान निस्वार्थ समाजसेवा करणाऱ्या समाज सेवकांचा सन्मान करण्याचे उपक्रम जैताई मंदिर समितीतर्फे राबविण्यात येत आहे.
सत्कारमूर्ती किशोर मोघेंसह मंदिर समितीचे बाळासाहेब सरपटवार, नरेंद्र नगरवाला, किशोर साठे, मुन्ना पोतदार, नामदेव पारखी, मयूर गोयनका, देवेंद्र पोल्हे व संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन देवेंद्र पोल्हे यांनी केले. तर आभार नहाते यांनी मानले.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)