नागेश रायपुरे, मारेगाव: आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपंचायत मारेगावचे आरक्षण आज 10 नोव्हेंबर रोजी स्थानिक नगर पंचायत कार्यालयातील सभागृहात जाहीर झाले. यात नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक हवसे गवसे नवसे यांना “कभी खुशी कभी गम” हे अनुभव वाट्याला आलेत.
यामध्ये प्रभाग क्र. 7, 13 व 15 अनुसूचित जमातीसाठी राखीव असून यातील वार्ड क्र. 7 व 15 हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. तसेच प्रभाग क्र. 11 व 12 हे अनुसूचित जाती साठी राखीव असून यातील प्रभाग क्र. 11 हा महिलांसाठी राखीव करण्यात आला आहे.
तसेच प्रभाग क्र 2, 3, 4, 5, 6, हा नामाप्र साठी आरक्षित असून यातील प्रभाग क्र. 2, 4, 5 हे महिलांकरिता आरक्षीत ठेवण्यात आले आहे. तसेच प्रभाग क्र. 1, 8, 9, 10, 14, 16, 17 हे प्रभाग सर्वसाधारण राखीव असून यातील प्रभाग क्र. 14, 16, 17 हे तीन वार्ड महिलांसाठी आरक्षीत करण्यात आलेले आहे.
आज काढण्यात आलेल्या या सोडतीमध्ये अनेकांचा हिरमोड झालेला असून काहींमध्ये उत्साह संचारल्याचे दिसून येत आहे. आरक्षण सोडतीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी अरुण मोकळ,नायब तहसीलदार व्ही. व्ही. दासरवार उपस्थित होते.