जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना काळातील संपूर्ण वीजबील माफ करावे, 200 युनिटपर्यंत वीज मोफत द्यावी, कृषीपंपाचे वीज बील निल करावे इत्यादी मागणीसाठी आज सोमवारी दिनांक 7 डिसेंबर रोजी वणीतील छ. शिवाजी महाराज चौक येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते.
वीजबीलमाफीसाठी तसेच स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आज संपूर्ण विदर्भात आंदोलन करण्यात आले. वणीत देखील आज विदर्भावादी कार्यकर्त्यांतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. कोरोनाकाळात लागलेल्या लॉकडाऊनमुळे अऩेक उद्योगधंदे बंद होते. या काळात सरकारने वीजबील माफ करण्याऐवजी उलट वाढीव बील पाठवले. कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणात लोकांचे रोजगार गेल्याने सरकारने वीजबील माफ करावे अशी मागणी आंदोलकांनी केली.
नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत करा
विदर्भात अतीवृष्टीमुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य सरकारने उर्वरीत महाराष्ट्राल 993 कोटी तर विदर्भाला अवघे 7 कोटींचा निधी देऊन थट्टा केली असा आरोपही विदर्भवादी आंदोलकांकडून करण्यात आला. वीजबील माफी संदर्भात शासनाने निर्णय घेतला नाही तर 4 जानेवारीला ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्या घराला घेराव घालण्यात येईल असा इशाराही देण्यात आला.
ठिय्या आंदोलनात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पुरुषोत्तम पाटील,रफिक रंगरेज, देवराव धांडे, मंगल चिंडालीया, राहुल खारकर, सृजन गौरकर, संजय चिंचोलकर, मंगेश रासेकर, अमित उपाध्ये, तुरविले, विजया आगबत्तलवार, बाळासाहेब राजूरकर, शैलेश गुंजेकर, दशरथ पाटील, दीपक नरवाडे, प्रफुल्ल भोयर, प्रियल पथाडे, प्रमोद खुरसाने, चैतन्य तुरविले, अलका मोहाडे, सुषमा मोडक, अनिल गोवरदीपे, गणपत पिंपलशेंडे यांच्यासह मोठ्या संख्येने विदर्भवादी आंदोलक उपस्थित होते.
[…] वणीत वीजबिल माफीसाठी ठिय्या आंदोलन […]