शेतक-याने फिरवले उभ्या पिकावर ट्रॅक्टर

कान्हाळगाव येथील घटना, उत्पादन खर्चही न निघाल्याची खंत

1

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील कान्हाळगाव येथील शेतकरी राजेंद्र चिकटे यांनी आपल्या शेतातील पराटीवर ट्रक्टर फिरवून पीक नष्ट केले. याआधीही तालुक्यात अनेक शेतक-यांनी उभ्या पिकांवर नांगर आणि ट्रॅक्टर फिरवून पिके नष्ट केली आहेत.

राजेंद्र चिकटे हे कान्हाळगाव येथील रहिवाशी आहेत. त्यांची आठ एकर शेती आहे. त्यांनी यावर्षी आपल्या शेतात कापूस लावला होता. शेतातील पराटीची चांगली वाढ झाली होती. मात्र त्यावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे त्यांचे उत्पन्न घटले. यावर्षी त्यांना केवळ 25 किंटल कापूस झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे अतिशय कमी उत्पन्न आहे. त्यामुळे अखेर नैराश्यात येऊन त्यांनी आपल्या शेतावर ट्रॅक्टर फिरवून पराटी नष्ट केली.

100 क्विंटल पेक्षा अधिक उत्पन्नाची अपेक्षा होती – शेतकरी
एका पराटीला 40 ते 50 बोंड आहे. मात्र यात बोंडअळीने हल्ला केला आहे.
या वर्षी 100 ते सव्वाशे क्विंटल कापूस होईल अशी आशा होती. परंतु यावर्षी बोंडअळीमुळे सर्व आशेवर पाणी फिरवले. त्यामुळे 25 क्विंटलही कापूस झाला नाही. यात 8 एकरवर लावलेला खर्च सुद्धा निघालेला नाही. त्यामुळे काळजावर दगड ठेऊन पराटीवर ट्रॅक्टर फिरवण्याचा निर्णय घ्यावा लागला.
– राजेश चिकटे, शेतकरी कान्हाळगाव

यावर्षी पाऊस आल्याने परिसरात पिके चांगली आली. मात्र त्यावर रोग आणि किटकांमुळे मोठे नुकसान शेतक-यांना सहन करावे लागले. याआधीही अनेक शेतक-यांनी पराटी आणि सोयाबिनवर नांगर फिरवल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

हे पण वाचा

बोगस लाभार्थ्यांनी लाटले शासनाचे कोट्यवधींचे अनुदान

हे पण वाचा

उद्याच्या भारतबंदला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा

Leave A Reply

Your email address will not be published.