सुशील ओझा, झरी: येथील एका जनरल स्टोर्स दुकानाच्या मागील भीत फोडून अज्ञात चोरट्याने गल्ल्यातील 5 हजार रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झरी येथे प्रशांत बबनराव उपरे (26) रा. दहेगाव यांच्या मालकीचे नमाई नावाचे जनरल स्टोर्स आहे. 13 व 14 जानेवारी या दोन दिवस दुकान मालक प्रशांत उपरे हे दुकानात आले नसल्याने दोन दिवस त्यांच्या दुकानातील कामगार यादव प्रकाश ठाकरे रा. पिवरडोल यांनी दोन दिवस दुकान सांभाळले. या दोन दिवसाच्या व्यवसायातून जमा झालेली 5 हजारांची रक्कम यादव यांनी शुक्रवारी दुकानाच्या गल्ल्यात ठेवली व दुकान बंद करून ते घरी गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी 15 जानेवारीला यादव हे दुकान उघडण्यासकरिता आले असता त्यांना दुकानाच्या मागील भागातील भिंत फोडलेली दिसली व काही सामान अस्थाव्यस्थ झालेले दिसले. यावरून दुकानात चोरी झाल्याची त्यांना शंका आली. त्यांनी गल्ल्यात ठेवलेले 5 हजार रुपये पाहिले असता ती रक्कमही गायब असलेली त्यांना आढळली.
यावरून यादव ठाकरे यांनी पाटण पोलीस स्टेशन गाठून दुकानात चोरी झाल्याची तक्रार दिली. तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरटया विरुद्ध कलम ४५७ ,३८० नुसार गुन्हे दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार अमोल बरापत्रे यांच्या मार्गदर्शनात जमादार अभिमान आडे व संदीप सोयाम करीत आहे.
हे देखील वाचा:
हे देखील वाचा: