मार्डी येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी

विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे मांडले आपले विचार

0

नागेश रायपूरे, मारेगाव: तालुक्यातील मार्डी येथील आदर्श विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती दि.12 मंगळवारला साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक पंढरीनाथ बोबडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक विलास ताजने, रमेश ढुमणे, नीतू मेश्राम उपस्थित होते.

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी विचार व्यक्त केले. ‘राजमाता जिजाऊने दिलेल्या संस्कारामुळेच शिवाजीराजे घडले.’ असे अध्यक्षीय भाषणात पंढरीनाथ बोबडे यांनी सांगितले.

तर ‘स्वामी विवेकानंद हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय साधणारे महापुरुष होते. युवकांचे प्रेरणास्थान होते.’ असे रमेश ढुमणे म्हणाले.

विद्यार्थी कृष्णा नांदे, प्रिया मांढरे, कल्याणी जुमडे, मीनल इरदंडे यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. संचालन वेदांती बोढाले, प्रास्ताविक तेजस्विनी जांभूळकर यांनी केले.

महेश्वरी टोंगे हिने आभार मानले. कार्यक्रमाला शिक्षक अनंता शिवरकर, लिपीक अंकुश कांबळे, भास्कर जीवतोडे यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. 

हेदेखील वाचा

चिकनचे रेट अर्ध्यावर, 20-25 टक्क्यांनी खप घटला

हेदेखील वाचा

शिंदोला येथील वसंतराव काळे यांचे निधन

Leave A Reply

Your email address will not be published.