झरी येथे आदिवासी परधान समाज संघटनेची सभा संपन्न

समाजातील विविध विषयांवर चर्चा

0

सुशील ओझा, झरी: झरी येथे दिनांक 24 जानेवारी रोजी आदिवासी परधान समाज संघटनेची सभा दु. 1 वाजता पार पडली. सभेला मोठ्या संख्येने पारधी समाजातील व्यक्ती उपस्थित होते. परधान समाज संघटनेचे अध्यक्ष दयाकर गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली व पदाधिका-यांच्या उपस्थितीत ही सभा घेण्यात आली. सभेमध्ये आदिवासींच्या विविध विषय आणि समस्यांवर चर्चा करण्यात आली.

आदिवासी विरुध्द शासनाचे धोरणे, शासकीय सेवेत असलेल्या बोगस आदिवासीयांचा प्रश्न, आदिवासी संघटन व बळकटीकरण, शिक्षण,समाजाची रूढी- परंपरा, संस्कृती, संवर्धन व जतन अशा अनेक विषयांवर विचार विनिमय करण्यात आले. यासह आदिवासी समाजावर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठविने, शासकीय योजनांची माहिती व समाज बांधवांना मदत करण्याची गरज, गावोगावी आदिवासी परधान समाज संघटनेच्या शाखा तयार करणे. तरुणांमध्ये संघटन कौशल्य निर्माण करणे, आदिवासी समाजाला एकसंघ ठेवणे या वर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मागील चार वर्षांपासून मोजक्या लोकांनी संघर्ष करीत समाजाला एक करण्याचे कार्य हाती घेतले होते ते आज बऱ्यापैकी साध्य तर झाले पण या आधुनिक धावत्या युगात आदिवासी समाजाचे आचार, विचार,कार्य इत्यादींचे जतन सह आदिवासी बांधव या आधुनिक काळात कुठेही मागे राहू नये, आदिवासीचे न्याय, हक्क, अधिकार मिळवण्यासाठी आदिवासी चळवळीची मशाल पेटती ठेवण्याची गरज आहे,असे विचार दयाकर गेडाम व समितीतील सदस्यांनी व्यक्त केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा:

एसीवर 40 टक्यांपर्यंतची सूट, ऑफर केवळ रविवार पर्यंत

आकाश पेंदोर मृत्यू प्रकरणी वणीत कॅन्डल मार्च

Leave A Reply

Your email address will not be published.