वणीत उद्यापासून बळीराजा व्याखानमालेला सुरुवात

ज्येष्ठ विचारवंत, लेखक चंद्रकांत वानखेडे प्रमुख व्याख्याते

0

जब्बार चीनी, वणी: शनिवारी दिनांक 30 जानेवारी पासून वणीत बळीराजा व्याख्यानमाला 2021 ला सुरूवात होत आहे. ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत, लेखक व शेतकरी चळवळीतील परिचित नाव चंद्रकांत वानखेडे हे या या व्याख्यानमालेत प्रमुख व्याख्याते राहणार आहे. शहरातील वरोरा रोडवरील बाजोरिया लॉन येथे शनिवार व रविवार ही व्याख्यानमाला चालणार आहे. या व्याखानमाले विविध विषयांवर व्याख्यान, परिसंवाद, मुलाखत इत्यादी कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे.

शनिवारी दिनांक 30 जानेवारी रोजी संध्याकाळी 6.30 वा. ‘गांधी का मरत नाही?’ या विषयावरील व्याख्यानाने या व्याख्यानमालेला सुरुवात होणार आहे. या विषयावर चंद्रकांत वानखेडे आपले विचार व्यक्त करणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु भालचंद्र चोपणे असणार आहे. यावेळी डॉ. शरद जावळे, अंबादास वागदरकर, वैभव जाधव, प्रा. डॉ. रेखा बदोडेकर, डॉ. भालचंद्र आवारी, वंदना इद्दे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

रविवारी दिनांक 31 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता चंद्रकांत वानखेडे यांची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे. पत्रकार संतोष कुंडकर व प्रा. डॉ. संतोष डाखरे हे चंद्रकांत वानखेडे यांच्याशी संवाद साधणार आहे. संध्याकाळी 6.30 वाजता ‘शेतीचे अनर्थकारण’ या विषयावर चंद्रकांत वानखेडे यांचे व्याख्यान आहे. या व्याख्यानाने या व्याख्यानमालेची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. गजानन सोडनर राहणार आहे. या व्याख्यानाला तारेंद्र बोर्डे, संजय पुज्जलवार, किरण दिकुंडवार, डॉ. स्नेहा खापणे, शाहिद खान, डॉ. किरण सपाट यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

बळीराजा 2021 या व्याख्यानमालेला शहरातील तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येन उपस्थित राहावे असे आवाहन शिव महोत्सव समितीचे डॉ. रमेश सपाट, डॉ. करमचंद राजपूत, कृष्णदेव विधाते, डॉ. सुनिल जुमनाके, डॉ अर्शद शाह, अशोक चौधरी, अनिल टोंगे, मोहन हरडे, जानू अजाणी, विलास शेरकी, संजय गोडे, सुरेंद्र घागे, रविंद्र आंबटकर, वसंत थेटे, अजय धोबे, संजय कालर, विजय दोडके, किसन कोरडे इ यांनी केले आहे.

बळीराजा व्याख्यानमालेचे हे सहावे वर्ष असून या व्याख्यानमालेत याआधी गंगाधर बनबरे, स्मीता पानसरे, डॉ. विजय जावंधिया, डॉ. मंजुश्री जयसिंग पवार, उत्तम कांबळे या विचारवंतांनी प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थिती दर्शवली आहे.

हे देखील वाचा:

रेतीची तस्करी करणारे तीन ट्रॅ्क्टर जप्त, 6 आरोपींना अटक

आझाद इलेक्ट्राॅनिक्सचा एसी बीग ब्लास्ट सेल AC Big Blast Sale

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.