ना. तहसीलदार व पटवारी यांच्यावरील हल्याविरोधात झरीत कामबंद आंदोलन

आरोपीला त्वरित अटक करण्याची महसूल कर्मचा-यांची मागणी

0

सुशील ओझा, झरी: उमरखेड येथे रेती माफियाने नायब तहसिलदार व तलाठी यांच्यावर केलेल्या प्राणघातक हल्ल्याविरोधात झरीत बुधवारी 27 जानेवारी रोजी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले. तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना, महसूल कर्मचारी संघटना, मंडळ अधिकारी संघटना, तलाठी व कोतवाल संघटना सहभागी झाल्या होत्या. दरम्यान या संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदनही सादर केले.

उमरखेड येथील नायब तहसीलदार उमरखेड वैभव पवार व तलाठी गजानन सुरोशे यांच्यावर दि 23 जानेवारी रोजी रात्री 11 वाजताच्या दरम्यान स्थानिक रेती माफिया अविनाश चव्हाण व त्याच्या सहका-यांनी चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. परंतू दिनांक 26 जानेवारी पर्यंत संबंधीत रेतीमाफियास अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे रेती माफियास तात्काळ अटक करावी या मागणीसाठी झरीतील महसूलच्या कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन पुकारले.

यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत रेती माफियाला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. दुपारी विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले. रेतीमाफियांवर कठोर कारवाई करून मकोका अंतर्गत अटक करावी, सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे इत्यादी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.

आंदोलनात तहसीलदार जी.एम.जोशी, नायब तहसीलदार आर.बी खिरेकार, व्ही.डी. मत्ते सी.पी.भोयर, एल.यु.वाटेकर, युयु.निमेकर, एस.वाय.पोलेवार, टी.पी.गोहणे, व्ही.बी.सुत्रावे, डी.एच.पांडे, ए.पी.पंधरे, ए.व्ही. चौधरी, एन.एस.मेश्राम, आर.बी.मोरे, कु.मनिषा बरशेटटीवार, ए जे शिंदे, डी.एन इटनकर, एस एस खैरे, आर एफ राणे, पी ए ढवळे, एस एच सिद्धीकी, एस एस मेश्राम, एस एन गीते, व्ही यु एमुरले, डी एल तोडसाम यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

हे देखील वाचा:

रेतीची तस्करी करणारे तीन ट्रॅ्क्टर जप्त, 6 आरोपींना अटक

उद्या वणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

Leave A Reply

Your email address will not be published.