पिंपळगाव येथे आरओ प्लान्टचा लोकार्पण सोहळा

आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले उद्धाटन

0

जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील ग्रामपंचायत पिंपळगाव (जुनाड, बोरगाव) येथे आरओ प्लान्टचा लोकार्पण सोहळा पार पडला. सदर प्लान्ट खनिज विकास निधी अंतर्गत बसवण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन म्हणून वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार होते.

प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. सदस्य विजय पिदूरकर, पं.स. सभापती संजय पिंपळशेंडे, जि.प.सदस्य बंडू चांदेकर, गजानन विधाते यांची उपस्थिती होती. त्याचसोबत नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य दीपक मत्ते, कविता मत्ते, सचिन वानखडे यांची देखील यावेळी उपस्थिती होती. गावातील नागरिकांना आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते पाण्याच्या कॅनचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक मत्ते यांनी केले. संचालन आकाश सुर यांनी केले तर आभार प्रदर्शन किशोर पिंपळशेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश मत्ते, बाळू ठेंगणे, राजु मत्ते, प्रवीण पिंपळशेंडे, विजय मत्ते, राकेश कायरकर, सुधाकर माडपाची यांनी परिश्रम घेतले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा:

आजोबानंतर नातवाचीही त्याच धरणात आत्महत्या

वणीत उद्यापासून बळीराजा व्याखानमालेला सुरुवात

Leave A Reply

Your email address will not be published.