ट्रकने घेतला अचानक पेट, ट्रक जळून भस्मसात

करणवाडीजवळची घटना, चालक, क्लिनर घटनास्थळावरून फरार

0

नागेश रायपुरे, मारेगाव: वरोरा येथून नवरगाव येथे रेती घेऊन निघालेल्या टिप्परने करनवाडीच्या समोर अचानक पेट घेतला. यात कोणतीही जीवित हानी झाली मात्र ट्रक संपूर्ण आगीत भस्मसात झाला. सोमवारी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी दुपारी ही घटना घडली. दरम्यान हा जळालेला ट्रक बघण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.

Podar School 2025

दुपारी 2.15 वाजताच्या सुमारास वरो-यावरून एक ट्रक ( MH34 AR 9400) रेती घेऊन नवरगावकडे जात होता. नवरगाव धरणाकडे जाणा-या मार्गा जवळ या ट्रकने अचानक पेट घेतला. ट्रकने पेट घेताच ट्रक चालक व त्याचे सहकारी घटना स्थळावरुन पसार झाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

परिसरातील नागरिकांनी आगीचे धुर पाहून घटना स्थळाकडे धाव घेतली. परंतू ट्रक पेटत असल्याने डीझलची टाकी फुटण्याच्या भितीने नागरीक आग विझवण्यासाठी पुढे सरसारवे नाही. परिणामी ही आग परिसरात वाढत गेली. व या आगीच संपूर्ण ट्रक जळून भस्मसात झाला.

ही आग ट्रकच्या वायरिंगमध्ये शाटसर्किट झाल्याने लागल्याचे बोलले जात आहे. ट्रक विझवण्यासाठी शासकीय स्तरावर कुणीही आले नव्हते.

हे देखील वाचा:

मुकुटबन ते बोरी मार्गावरील विविध पुलांचे काम बंद अवस्थेत

मारेगाव पोलिसांची रेती तस्करांवर टाच, 3 तस्करांना अटक

Leave A Reply

Your email address will not be published.