मारेगाव तालुक्यात 29 ग्रामपंचायतीत राहणार ‘महिला राज’
सरपंचपदाचे आरक्षण जाहीर... कोणत्या गावातील सरपंचपद महिलांसाठी झाले राखीव?
नागेश रायपुरे, मारेगाव: आज गुरुवारी दिनांक 4 फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथे महिलांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यात 56 ग्रामपंचायतीतर्फे 29 जागी महिलाराज असणार आहे. 2 जानेवारीला सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले होते. त्यानंतर सर्वांच्या नजरा यातील कोणत्या ग्रामपंचायत महिलांसाठी राखीव राहणार याकडे लागल्या होत्या.
असे राहणार आरक्षण:
खुला प्रवर्ग महिला राखीव – केगाव, खैरगाव (बु.), मजरा, सिंदी, हिवरा-मजरा, टाकळी, वेगाव, कानडा, वनोजा देवी
सर्वसाधारण खुला – किन्हाळा, बोरी, आपटी, करणवाडी, मांगरुळ, कुंभा, मार्डी,
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला – गाडेगाव, चोपन, इंदिरा ग्राम, कोसारा, हिवरी, गौराळा
सर्वसाधारण ओबीसी – सावंगी को (ना.म.प्र. सर्वसाधारण), इंदिरा ग्राम. शिवणी धोबे,
कोलगाव अनुसुचित जाती महिला, टाकरखेडा अनुसुचित जाती सर्वसाधारण
अनुसुचित जमाती (महिला) – चिंचमंडळ, दांडगाव, नवरगाव, शिवनाळा, वरुड, गोदनी, हटवांजरी, घोगुलदरा, अर्जुनी, घोडदरा, गोंडबुरांडा, बोरी (खु), खडकी बुरांडा, डोल डोंगरगाव, पिसगाव
अनुसुचित जमाती सर्वसाधारण – कोथुर्ला, देवाळा, खंडणी, वागदरा, सगनापूर, जळका, बोटोणी, सराटी, नरसाळा, कान्हाळगाव, मछिंद्रा, चिंचाळा, म्हैसदोडका, पहापळ
हे देखील वाचा: