मारेगाव येथे संजय देरकर यांचा सपत्नीक सत्कार

स्वराज्य संघटनेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन

0

नागेश रायपुरे, मारेगाव: येथील कॉ. नत्थुजी पाटील किन्हेकार सभागृहात यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष संजय देरकर व त्यांच्या पत्नी किरण देरकर यांचा सत्कार करण्यात आला. स्थानिक संघटना स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख तथा पं.स.सदस्य संजय निखाडे, विशेष अतिथी पं.स. सभापती शीतल पोटे होत्या. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दीपक कोकास, शहर प्रमुख राजू तुराणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. हा सत्कार समारंभ स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष गजानन किन्हेकार यांच्या मार्गदर्शनात पार पडला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे उपाध्यक्ष राजू मांदाडे, जिल्हाध्यक्ष सचिन पचारे, विधानसभा प्रमुख विशाल किन्हेकार, सोमेश्वर गेडेकर, गोपाल खामनकर, भास्कर वेले,अनिल राऊत, विकास राऊत, प्रवीण काळे, सूरज वाढई, सैलानी सैय्यद, उमेश उलमाले, राजु गौरकर, राजू खडसे, सूरज गमे, प्रवीण गमे, जीवन वैध, अरविंद परचाके, राजू ठक, विलास किन्हेकार, नत्थु बदकी आदींनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा:

काँग्रेस कमेटीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रमण डोये

बोरी गावातील तरुणांचा युवासेनेत प्रवेश

Leave A Reply

Your email address will not be published.