चोरट्याने फोडले दुकान, 70 हजारांची रक्कम लंपास

रासा येथील घटना, अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल

0

जितेंद्र कोठारी, वणी: दुकानाच्या गल्यातील ड्रॉवर मध्ये ठेवलेले 70 हजार रुपये अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याची घटना तालुक्यातील रासा येथे उघडकीस आली. याबाबत फिर्यादी सूर्यभान माधव राजूरकर रा. रासा यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

Podar School 2025

रासा येथील सुर्यभान राजूरकर यांचे शेतीसह किराना मालाचे दुकान आहे. त्याचे दुकान घराच्या पुढेच आहे. 2 फेब्रुवारी रोजी रात्री 8.30 वाजता राजूरकर दुकान बंद करून घरी गेले. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी दुकान उघडण्यासाठी गेले असता दुकानाच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांनी दुकानात आत जाऊन बघितले असता दुकान माल विक्रीचे 20 हजार तसेच यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेतून काढून आणलेले 50 हजार असे एकूण 70 हजार रुपये गल्यातून चोरी झाल्याचे लक्षात आले. सूर्यभान राजूरकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्द 461, 380 अनव्ये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हे देखील वाचा:

केसुर्ली येथे विवाहितेची आत्महत्या, दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न

सुविधा लॉन्स समोरुन दुचाकी लंपास

Leave A Reply

Your email address will not be published.