सुशील ओझा, झरी: येथील नगरपंचायतीच्या माजी महिला नगरसेवकाच्या घरासोरून सांडपाणी वाहत असल्याने विविध आजार होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत त्यांनी सीईओकडे अनेकदा तोंडी तक्रार केली आहे. मात्र त्यावर अद्यापही कोणते पाउल उचलले गेले नाही. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
झरी नगरपंचायतीच्या माजी महिला नागसेवक ज्योती बीजगूनवार यांच्या घरासमोरील सिमेंट रस्त्याने गावातील सांडपाणी गेल्या तीन ते चार महिन्यापासून वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. य़ाशिवाय आजाराचीही दाट शक्यता आहे. घरासोरील रस्त्याने सांडपाणी वाहत असल्याचे तोंडी तक्रार नगरसेवकांचे पती संजय बीजगूनवार यांनी अनेकदा सीईओ कडे केली असल्याचे सांगितले.
यावर अभियंता व सीईओ यांनी दोन ते तीन वेळा येऊन पाहणी केली परंतु सांडपाण्याची विल्हेवाट लावली नसल्याची माहिती बीजगूनवार यांनी दिली आहे. तीन ते चार महिने लोटून सुद्धा आज करतो उद्या करतो म्हणत सीईओ चालढकल करत असल्याची तक्रार संजय बी
जगूनवार यांनी केली आहे. तरी सदर सांडपाण्याचे विल्हेवाट त्वरित करावी अशी मागणी माजी नगरसेवक ज्योती बीजगूनवार व संजय बीजगूनवार यांनी केली आहे.
हे देखील वाचा: