सोशल मीडियाच्या माध्यमातून अपघातग्रस्ताला मदत

मारेगाव येथील अंकुश माफुर यांच्या प्रयत्नातून 1.5 लाख गोळा

0

नागेश रायपुरे, मारेगाव: सोशल मीडियाचा अधिकाधिक युजर्स वेळ घालवण्यासाठीच करतात. मात्र त्याचा समाजोपयोगी कामासाठी उपयोग करणारेही बोटावर मोजण्याइतकेच लोक आहेत. याचीच प्रचिती मारेगावमध्ये आली. मारेगाव येथील एका सामाजिक कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून एका अपघातग्रस्ताना मदत गोळा करण्यात आली. सुमारे दीड लाखांची मदत अपघातग्रस्ताच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आली आहे. 

सावंगी मेघे येथील विनोद गजर (35) यांचा वर्धा जिल्ह्यातच अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर इजा झाली. डॉक्टरांनी ब्रेनच्या ऑपरेशनसाठी नागपूर येथे हलवण्याचा सल्ला दिला. मात्र हा खर्च अधिक असल्याने ते उपचाराविनाच होते. अपघातग्रस्ताला आर्थिक मदतीची नितांत गरज असल्याची माहिती मारेगाव येथील अंकुश माफुर यांना याबाबत माहिती मिळाली.

समाजबांधवाला आर्थिक मदतीची गरज असल्याची माहिती अंकुश यांनी सरोदे समाजातील काही व्यक्तींना दिली तसेच त्यांच्याशी फोनवरून मदतीबाबत चर्चा केली. अखेर सोशल मीडियाच्या माध्यमातून क्राउड फंडिंगचा निर्णय घेण्यात आला. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून अंकुश माफूर यांनी मदतीचे आवाहन केले. पाहता पाहता विदर्भात सरोदे समाज बांधवांनी आपापल्या परिने मदत अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली. अखेर 1 लाख 43 हजार रुपयांची मदत गोळा झाली.

ही सर्व मदत अपघातग्रस्ताच्या कुटुंबीयांकडे सुपुर्त करण्यात आली आहे. या कामात पुढाकार घेतल्याने अंकुश माफुर यांचे कौतुक होत आहे. या कामात अखिल भारतीय सरोदी समाज संघटनेचे अध्यक्ष रामसेवक मोरे, संघटक पाडुरंग गदाई, विदर्भप्रातं उपाध्यक्ष किशोर शिंदे व सुभाष वाघडकर, विदर्भ प्रवक्ते सुरेंद्र भीसे, चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष भास्कर भोयर, प्रवक्ते किशोर मोरे, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष संतोष गदाई, अकोला जिल्हा अध्यक्ष राजुभाऊ एकणार. अदिलाबाद अध्यक्ष सुनील मंडाळे यांच्यासह शंकर वाईकर, भारत भोयर, पुंडलीक सुडीत. बाबुजी भोयर, महादेवजी पोटे, मोहन वाईकर यांनी मदत केली.

हे देखील वाचा:

वणीत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात चक्काजाम आंदोलन

माजी महिला नगरसेवकाच्या घरासमोरुनच वाहते सांडपाणी

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.