मुरुमचे अवैधरित्या उत्खनन प्रकरणी 8.5 लाखांचा दंड

डोंगरगाव येथील तलाव परिसरातून जप्त केले जेसीबी व ट्रॅक्टर

0

सुशील ओझा, झरी: जेसीबीने मुरूम उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करणाऱ्या जेसीबी व ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडून जप्त केला होता. तालुक्यातील डोंगरगाव पारधी बेड जवळील तलावाच्या ठिकाणी ही कार्यवाही करण्यात आली होती. या प्रकरणी महसूल विभागाने जेसीबी व ट्रॅक्टरवर दंड लावला असून सुमारे 8.5 लाख रुपयांचा दंड मालकास ठोठावण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की डोंगरगाव येथील तलावातील मुरूम जेसीबीने राजरोसपणे उत्खनन सुरु होते. या मुरुमची ट्रॅक्टर द्वारे वाहतूक करून सदर मुरूमचा डोंगरगाव ते सिंधीवाढोना रस्त्याच्या कामासाठी उपयोग सुरु होता. ही माहिती शिवसेनेचे तालुका प्रमुख चंद्रकांत घुगुल यांना मिळाली. त्यांनी 25 जानेवारीला महसूल विभागाला याची फोनवरून माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठांनी तलाठी बी. बहुरे यांना घटनास्थळी कार्यवाही करण्यास पाठवले.

संध्याकाळी 4 वाजताच्या दरम्यान तलाठी डोंगरगाव येथील तलावावर पोहचले असता त्यांना जेसीबीने मुरूम उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले यासह मुरुमची ट्रॅक्टरने वाहतूक सुरू असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. तलाठी यांनी जेसीबीने होणारे उत्खनन बंद करून जेसीबी (MH29 AK774) व ट्रॅक्टर (MH29 C4514) जप्त केले. सदर वाहनं कुणाच्या मालकीचे आहे असे विचारणा केली असता जेसीबी चालक संजय नक्षीने व टॅक्टर चालक संतोष सुरपाम यांनी वणी येथील दिलीप सातपुते यांचे असल्याचे सांगितले.

पोलिसांनी मुकुटबन पोलीस स्टेशनला जेसीबी व टॅक्टर आणून जमा केले. तहसीलदार यांनी 8 फेब्रुवारीला जेसीबीवर 7 लाख 54 हजार 250 रुपये व ट्रॅक्टरवर 1 लाख 4 हजार 150 असा एकूण 8 लाख 55 हजार 300 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सदर ठेकेदारांनी 8 ते 10 ट्रिप अवैधरित्या उत्खनन केलेले मुरुम रोडच्या कामासाठी टाकल्याची माहिती आहे.

हे देखील वाचा:

पोलीस दिसतात दारू तस्कर गाडी सोडून पसार

कामाहून परत येणा-या तरुणावर काळाचा घाला

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.