भाजप प्रज्ञा सेलच्या कार्यकारिणीवर वणीतील चौघांची वर्णी

25 जणांची प्रबुद्ध कार्यकारिणी जाहिर

0

जब्बार चीनी, वणी: बुद्धीजीवी माणसांना समाजोपयोगी कार्यात सक्रिय होता यावे यासाठी यवतमाळ जिल्ह्याच्या प्रज्ञा सेल आघाडीचे गठण करण्यात आले. सोमवारी यवतमाळ येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या कार्यकारिणीत वणीतील चौघाची निवड झाली आहे.

डॉ श्रीरधरराव देशपांडे ह्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या आघाडीत सेवानिवृत्त प्राध्यापक महादेवराव खाडे कडे कार्याध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे तर प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे ह्यांच्याकडे सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. याशिवाय 25 जणांची प्रबुद्ध कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली आहे. यात वणीतील विधिज्ञ प्रवीण पाठक व पायल परांडे ह्यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा महामंत्री राजू पडगिलवार, दत्ता रहाणे तथा जिल्हा कार्यालय मंत्री सुनील घोटकर ह्यांनी सदर नियुक्ती कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा ह्यांच्या नेतृत्वात भरीव कार्य करण्यासाठी नूतन कार्यकारणीला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यकारिणी अध्यक्ष डॉ श्रीधरराव देशपांडे ह्यांनी सदर आघाडीचा उद्देश तथा अपेक्षित कार्यप्रणालीचे विस्तृत विवेचन केले. कार्याध्यक्ष महादेवराव खाडे तथा प्राचार्य प्रसाद खानझोडे ह्यांच्या मनोगता नंतर सदर कार्यक्रमाची सांगता झाली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा:

मुरुमचे अवैधरित्या उत्खनन प्रकरणी 8.5 लाखांचा दंड

पोलीस दिसतात दारू तस्कर गाडी सोडून पसार

 

Leave A Reply

Your email address will not be published.