विवेक तोटेवार, वणी: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्ह्यात लॉकडाऊनचे नवीन नियम लागू करण्यात आले आहे. याशिवाय कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी शहरात पोलीस, महसूल व नगरपालिका प्रशासनाने संयुक्तरित्या मोहिम राबवणे सुरू केले आहे. शनिवार 20 फेब्रुवारी रोजी प्रशासनाने विनामास्क फिरणारे, सोशल डिस्टनसिंगचे नियम मोडणे, तसेच मंगल कार्यालयात 50 पेक्षा अधिक लोक आढळून आल्याने एका मंगल कार्यालयावरही कारवाई करण्यात आली. दरम्यान शहरात शुक्रवारी कोरोनाचा 1 रुग्ण आढळून आला तर शनिवारी कुणीही पॉजिटिव्ह आढळून आले नाही.
14 लोकांवर सोशल डिस्टनसिंग न पाळल्याने, 4 व्यक्तींवर विनामास्क तर एक मंगल कार्यालयात 50 लोकांपेक्षा अधिक लोकांना आमंत्रित केल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत 19 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली होती.
सोशल डिस्टनसिंगचे पालन न करणाऱ्यांवर 200 रुपये दंड आकारण्यात आला. तर विनामास्क फिरणाऱ्यावर 500 रुपये व लग्न किंवा इतर प्रसंगी 50 लोकांपेक्षा अधिक गर्दी जमविनाऱ्यावर 2000 रुपये दंड आकारण्यात आला. 2000 रुपये हा दंड वणीच्या गणेशपूर रोडवर स्थित आकाश मॅरेज हॉल वर लावण्यात आला आहे.
सदर कारवाई ही वणीच्या टिळक चौकात दुपारी 14 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत करण्यात आली. तर सायंकाळी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. आज ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे. दरम्यान लोकांनी लॉकडाऊनचे नियम पाळावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
हे देखील वाचा: