सोशल मीडियावरील लॉकडाऊनच्या विविध आदेशामुळे संभ्रमाचे वातावरण

'हे' आहेत लॉकडाऊनचे नवीन नियम...

0

जब्बार चीनी, वणी: कोरोनाचा आलेख अचानक वाढल्याने जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. मात्र नवीन लॉकडाऊनचे नियम काय राहील याबाबत जिल्हाधिकारी यांचे दोन आदेश व विभागीय आयुक्त यांचा एक आदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने बाजारपेठ सुरू आणि बंद करण्याचा नेमका वेळ कोणता? तसेच लॉकडाऊन अंतर्गत कोणते निर्बंध आणले गेले याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. सुधारित नियमांनुसार आता बाजारपेठेची वेळ ही सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत राहणार आहे. तर कन्टेन्मेंट झोनसाठी ही मर्यादा दुपारी 3 वाजे पर्यंत राहणार आहे. मात्र वणीत अद्याप एकही कन्टेन्मेंट झोन नसल्याने बाजारपेठेचा वेळ हा सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत राहणार आहे. तर नवीन नियमांनुसार रेस्टॉरंट डायनिंगसाठी बंद राहणार असून रेस्टॉरंटमध्ये केवळ पार्सल सुविधा उपलब्ध राहणार आहे. हे नियम 1 मार्चपर्यंत लागू राहणार आहे.

काय आहेत लॉकडाऊनचे नवीन नियम?
महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपालिका क्षेत्रातील जे उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी यापूर्वीच देण्यात आलेली आहे, ते उद्योग नियमितपणे सुरू राहिल. सर्व प्रकारची शासकीय कार्यालयातील संख्या ही 15 टक्के किंवा 15 व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल, ती ग्राह्य धरून सुरू ठेवण्यात येतील. तर सर्व प्रकारच्या खाजगी कार्यालयातील कर्मचा-यांची संख्या एकूण 15 टक्के किंवा कमीत कमी 15 कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल, ती ग्राह्य धरून सुरू ठेवण्यात येतील.

ग्राहकांनी खरेदीसाठी जवळ असलेल्या बाजारपेठ, अतिपरिचित दुकानदार यांच्याकडे खरेदी करावी. शक्यतो दूरचा प्रवास करून खरेदी करणे टाळावे. सर्व प्रकारची उपहारगृहे हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधा देण्यास परवानगी राहील. लग्न समारंभाकरिता वधू व वर पक्षासह पंचवीस व्यक्तींना परवानगी राहील. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालय येथील अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई माहिती, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल घोषित करणे इत्यादी कामांकरिता परवानगी राहील.

मालवाहतूक की नेहमीप्रमाणे सुरू राहील आणि वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाहीत. सर्व प्रकारची सार्वजनिक व खासगी वाहतूक करताना चारचाकी वाहनांमध्ये चालकाव्यतिरिक्त इतर 3 प्रवासी, तीन चाकीमध्ये चालकाव्यतिरिक्त 2 प्रवासी, दुचाकीवर हेल्मेट व मास्कसह दोन प्रवासी यांना परवानगी राहील. आंतरजिल्हा बस वाहतूक करताना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के प्रवाशांसह सोशल डिस्टंसिंग व निर्जंतुकीकरण करून वाहतुकीसाठी परवानगी राहील. यासाठी विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे नियोजन करतील.

सर्व धार्मिक स्थळे ही एकावेळी दहा व्यक्तींपर्यंत मर्यादित स्वरूपात सुरु राहील. भाजी मंडई सकाळी 3 ते 6 या कालावधीत सुरू राहील. सदर मंडईमध्ये किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश राहील. संपूर्ण यवतमाळ जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद राहतील.

संपूर्ण जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे बंद राहतील. ग्रामीण व शहरी भागांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलने या कालावधीत बंद राहतील. सकाळी 8 वाजेपर्यत मार्नीग वाँक व व्यायामास सुट राहील. सद्यस्थितीमध्ये मिशन बिगीन अगेन अंतर्गत जी सूट देण्यात आलेली होती, ती रद्द करून सदरचे निर्बंध एक मार्च 2021 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

‘या’ कारणांमुळे निर्माण झाला गोंधळ
जिल्ह्यात कोरोनाचा अचानक विस्फोट झाल्याने दिनांक 18 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊन बाबत एक आदेश पारीत केला. यात बाजारपेठेची वेळ ही रात्री 8 पर्यंत देण्यात आली होती. तर रेस्टॉरन्टसाठी रात्री 9.30 वाजे पर्यंतची वेळी देण्यात आली होती. याशिवाय इतर गोष्टीबाबतही अनेक निर्बंध ठेवण्यात आले होते. दिनांक 21 फेब्रुवारी विभागीय आयुक्तांनी लॉकडाऊन एक आदेश पारीत करत लॉकडाऊनचे  नियम अधिक कठोर करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचना केली. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी कन्टेन्मेंट झोनबाबत नवीन आदेश पारित केला. त्यात बाजारपेठेचा वेळ हा सकाळी 8 ते दुपारी 3 पर्यंत आहे. मात्र प्रतिबंधित क्षेत्रासाठी हा आदेश असल्याचे अनेकाच्या निदर्शनास न आल्याने बाजारपेठेचा वेळ दुपारी 3 पर्यंत असल्याचा अनेकांचा समज झाला. हा आदेश व्हायरल झाल्याने गोंधळ झाला. दरम्यान वणीत अद्याप कन्टेन्मेंंट झोन नसल्याने वणीकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 

हे देखील वाचा:

सावधान… विना मास्क, गर्दी करणे पडू शकते महागात

अल्पवयीन मुलगी रात्रभर घरीच आली नाही…

Leave A Reply

Your email address will not be published.