विवेक तोटेवार, वणी: गणेशपूर ग्रामपंचायत अंतर्गत आर्यन हेरिटेज या सदनिकेचे काम सुरू आहे. या सदनिकेतील अनेक फ्लॅट विकल्या गेले आहे. या सदनिकेतवर बिल्डर मोबाईल टॉवर लावत आहे. याला सदनिकेतील रहिवाशांनी विरोध केला आहे. याबाबत मंगळवारी दिनांक 23 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
गणेशपूर ग्रामपंचायतच्या हद्दीत आर्यन हेरिटेज ही सदनिका आहे. या सदनिकेतील बिल्डरने काही फ्लॅट विकले आहे. 24 महिन्यात काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले. परंतु अजूनही काम पूर्ण न झाल्याने सदनिका विकत घेणाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. सदर प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे.
प्रकरण कोर्टात असतानाही बिल्डर या सदनिकेवर मोबाईल टॉवर लावत आहे. याकरिता बिल्डरने कुणाचीही परवानगी घेतली नाही. शिवाय राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे लोकवस्तीच्या ठिकाणी टॉवरची उभारणी करण्यास बंदी केली आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
मोबाईल टॉवरमुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याने व नवीन सरकारी अध्यादेशाप्रमाणे बिल्डरचा फ्लॅटच्या टॉवरवर कोणताही अधिकार नसताना हा गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप सदनिकेतील रहिवाशांनी केला आहे. सदर बिल्डरवर कायदेशीर कारवाई व टॉवर उभारणीसाठी आलेला माल जप्त करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
हे देखील वाचा: