आरसीसीपीएल सिमेंट कंपनीला हंसराज अहीर यांची भेट
परिसरातील तरुणांना ट्रेनिंग देण्याची सूचना
सुशील ओझा, झरी: माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी तालुक्यातील मुकुटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट कंपनीला भेट दिली. इथे सध्या प्रकल्प उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. दरम्यान अहिर यांनी तरुण बेरोजगार मुलांकरिता विविध ट्रेनिंग देण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना कंपनी व्यवस्थापनाला दिल्या.
तालुक्यातील तसेच परीसरातील गावांमधील आयटीआय व बेरोजगार तरुणांना आत्तापासूनच लोडींग, पॅकेजिंगचे ट्रेनिंग मिळाले तर कंपनीचे उत्पादन सुरु झाल्यावर सभोवतालच्या गावांमधील तरुणांना रोजगार मिळेल. तसेच सभोवतालच्या गावांना सामाजिक दायित्व निधी उपलब्ध करून दिल्यास गावाचा विकास होईल. त्यामुळे गावांना निधी पुरवावा अशी सूचना त्यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिल्या.
यावेळी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा सरचिटणीस रवी बेलुरकर, जिल्हा सचिव किशोर बावणे, जिल्हा सचिव शंकर लालसरे, झरी तालुका अध्यक्ष सतीश नाकले, उपाध्यक्ष न प वणी श्रीकांत पोटदुखे, जेष्ठ नेते अशोक रेड्डी बोदकुरवार आदींची उपस्थिती होती.
हे देखील वाचा:
लॉकडाऊनमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी सोडून घरी आला आणि सरपंच झाला
आज शहरात कोरोनाचे 5 रुग्ण, रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ