नगर परिषद वणीचे 6 कोटी 47 लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक

चालू वर्षासाठी 137 कोटी 37 लाखांचा अर्थसंकल्प मंजूर

0

जब्बार चीनी, वणी: येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात अर्थसंकल्पानिमित्त विशेष सभा पार पडली. यात वणी नगर परिषदेने पुढील 2021- 22 साठी 137 कोटी 37 लाख रुपयांचे अर्थसंकल्प मंजूर करण्यात आले. त्यात 6 कोटी 47 लाख शिलकीचे अंदाजपत्रक आहे. मागील 2020-21 या वर्षी 5 कोटी 15 लाख रुपये शिलकीचे अंदाजपत्रक होते.

या अर्थसंकल्पीय विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी वणी नगर परिषदेचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे हे होते. त्यांचे सोबत व्यासपीठावर मुख्याधिकारी संदीप माकोडे, उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे हे उपस्थित होते. या सोबत नगर परिषदेचे सर्व विषय समित्यांचे सभापती, नगर परिषद सदस्य, विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

पुढील 2021- 22 च्या अर्थसंकल्पात प्रारंभिक शिलकीसह महसूली जमा 36 कोटी 3 लाख 43 हजार 889 रुपये आहे. महसुली खर्च 35 कोटी 97 लाख रुपये आहे. यात 6 लाख43 हजार 889 रुपये अखेरची शिल्लक राहणे अपेक्षित आहे. भांडवली जमा 101 कोटी 55 लाख 43 हजार 790 रुपये जमा अपेक्षित आहेत. यात 95 कोटी 14 लाख 86 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. यात 6 कोटी 40 लाख 57 हजार 790 रुपये शिल्लक राहणे अपेक्षित आहे.

वणी नगर परिषदेमध्ये 2021- 22 च्या अर्थसंकल्पात प्रारंभिक जमा 55 कोटी 12 लाख 79 हजार 179 रुपये आहेत. पुढील वर्षी 82 कोटी 46 लाख 8 हजार 500 रुपये विविध माध्यमातून जमा होणे अपेक्षित आहे. असे एकूण पुढील वर्षी 137 कोटी 58 लाख 87 हजार 679 रुपये जमा होतील असा अंदाज आहे. यातील पुढील वर्षी 131 कोटी 11 लाख 86 हजार रुपये अपेक्षित खर्च वगळुन 6 कोटी 47 लाख रुपये शिल्लक राहिल असे अंदाजपत्रक आज मंजूर करण्यात आले आहे.

विकास कामासाठी 2021- 22 या वर्षात 6 कोटी 50 लाख रुपये शासनाकडून विविध योजनांकरिता निधी मिळणे अपेक्षित आहे. या सभेत 2020- 21 या आर्थिक वर्षात नगर पालिकेचे 144 कोटी 95 लक्ष रुपयांचे जमा खर्च मंजूर करण्यात आले आहे.

हे देखील वाचा:

लॉकडाऊनमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी सोडून घरी आला आणि सरपंच झाला

आज शहरात कोरोनाचे 5 रुग्ण, रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ

Leave A Reply

Your email address will not be published.