अडेगाव येथे विजेचा शॉक लागून चिमुकलीचा मृ्त्यू
अंगणातील तारांवर कपडे वाळू घालताना घडली घटना
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथील एका 11 वर्षीय चिमुकलीचा विजेच्या जिवंत ताराला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज शुक्रवारी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान घडली. कु श्रुती किशोर थाटे असे मृत चिमुकलीचे नाव असून ती 5 व्या वर्गात शिकत होती.
दुपारी श्रुती ही ही आंघोळ केल्यानंतर आपले कपडे वाळू घालण्याकरिता अंगणातील कपडे वाळू घालण्यासाठी बांधलेल्या ताराकडे गेली. तारांवर कपडे वाळू घालण्यासाठी टाकताच तिला विजेचा जोरदार धक्का बसला व ती दूरवर फेकली गेली. या अपघातात तिला मारसुद्धा लागला. घटनेची माहिती मिळताच गावातील संजय आसुटकर, राकेश किन्हेकर, दीपक हिरादिवे व घाटे यांनी मदतीसाठी धाव घेतली.
त्यांनी श्रुतीला गावातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. तिथून तिला मुकुटबन येथील शासकीय रुग्णालयात नेले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने 108 एमबुलन्सद्वारा श्रुतीला वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिचा उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला.
मृत्यू झाल्याची वणी पोलीस स्टेशनला आजोबा ईश्वर देवाळकर यांनी तक्रार दिली. यावरून पोलिसांनी मृत्यूची नोंद केली. श्रुतीचे वडील एका खासगी कंपनीत जेसीबी चालक असून आई घरातीलच छोटे कापडचे दुकान चालऊ आपला उदरनिर्वाह करतात. कु श्रुती ही पाचव्या वर्गात शिकत होती. घरातील चिमुकली गेल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला लागला आहे. श्रुतीच्या मृत्यूने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
इलेक्ट्रिक पोलच्या केबलचा अंगणातील तारात प्रवाह
श्रुतीच्या घराजवळील इलेक्ट्रिक पोलवरून आलेल्या लाईनची तार वाळू घातलेल्या तारांवर आली. त्याचा प्रवाह अंगणातील कपडे वाळू घालण्याच्या तारांमध्ये आला. त्यामुळे कपडे वाळू घालताच श्रुतीला विजेचा जोरदार धक्का बसला. अशी माहिती आहे.
हे देखील वाचा:
लॉकडाऊनमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी सोडून घरी आला आणि सरपंच झाला
आज शहरात कोरोनाचे 5 रुग्ण, रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ