वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर
आता हाय प्रेशर मशिनद्वारा करा पाण्याच्या टाकीची स्वच्छता
विवेक पिदूरकर: दुषीत पाणी पुरवठ्यामुळे पाण्याची टाकीत मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा साचलेला असतो. असे पाणी वापरणे आरोग्यास हाणीकारक असते. त्यामुळे पाण्याच्या टाकीची वेळोवेळी स्वच्छता करणे गरजेचे आहे. मात्र आता याबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण वणीमध्ये आता पिण्याच्या पाण्याची साफ करण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आले आहे. याद्वारा अत्यल्प दरात इमारतीवरील तसेच जमिनी खालील टाकी हाय प्रेशर मशिनद्वारे साफ करून दिली जाणार आहे. शहरातील दिप एन्टरप्राईजेस तर्फे ही सेवा देण्यात येत आहे.
शहरात कायमच अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असतो. गाळ मिश्रीत किंवा क्षारयुक्त पाणी घरी येत असल्याने त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो. त्यामुळे त्वचारोग, केस गळणे, टाकी खराब होणे, पाईमलाईन खराब होणे, इत्यादी समस्या उद्भवतात. तसेच पाण्याचा फोर्सही कमी होतो. शिवाय टाकी साफ करणे हे घरी एका व्यक्तीला शक्य होत नसल्याने अस्वच्छ टाकीतीलच पाणी आपण वर्षानुवर्ष वापरतो.
ही समस्या लक्षात घेऊन वणीमध्ये दिप एन्टरप्राईजेसतर्फे अत्याधुनिक मशिनद्वारा पाण्याची टाकी साफ करण्याची सेवा दिली जात आहे. केवळ अत्याधुनिक मशिनद्वारा टाकीची साफसफाईच नाही तर टाकी निर्जंतूकदेखील करून दिली जाणार आहे. यासाठी दर ही अत्यल्प आहे. घर, फ्लॅट स्किम, सोसायटी, शाळा-कॉलेज, दुकान, रेस्टॉरन्ट, हॉटेल इत्यादीसाठी ही सेवा लाभदायक ठरू शकते. वणी शहराशिवाय परिसरातील गावातील व्यक्तींना ही सेवा घेता येणार आहे.
अधिक माहिती साठी तसेच बुकिंगसाठी 8766562764 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पत्ता: दीप एन्टरप्राईजेस, गणपती रेसिडेन्सी, विंग बी 1, छोरिया ले आऊट, गणेशपूर वणी. ता. वणी जिल्हा यवतमाळ
हे देखील वाचा: