मुकुटबन येथे नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार

मॉर्निंग वॉक गृपतर्फे सत्काराचे आयोजन

0

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील मॉर्निंग वॉक ग्रुपच्यावतीने नवनिर्वाचित सरपंच मीना जगदीश आरमुरवार यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक तथा सरपंच यांचे पती जगदीश आरमुरवार हे यावेळी अध्यक्षस्थानी होते. सेवानिवृत्त केंद्र प्रमुख प्रकाश दिकोंडवार यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

शरीर सुदृढ व निरोगी रहावे याकरिता पुरुष, महिला, तरुण, तरुणी सकाळ व सायंकाळ पायदळ फिरण्याकरिता जातात. मुकुटबन इथेही मर्निग वॉक करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. अशा व्यक्तींचा एक ग्रुपही तयार करण्यात आला आहे. याग्रुप मध्ये सर्वसामान्यां पासून शिक्षक, अधिकारी वर्ग सुद्धा आहे.

ग्रुपच्या माध्यमातून नवनिर्वाचित महिला सरपंच मीना जगदीश आरमुरवार यांचा सत्कार सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमचे सूत्रसंचालन शिक्षक चिटलवार यांनी केले. प्रास्ताविक शिक्षक केशव नाकले यांनी केले. स्त्री शक्तीची अभिव्यक्ती ही मुकुटबन नगरीच्या सरपंचपदी विराजमान झालेल्या महिलेच्या रूपाने पहायला मिळत असल्याचे प्रतिपादन यावेळी नाखले यांनी केले. यावेळी सेवानिवृत्त केंद्र प्रमुख प्रकाश दिकोंडवार यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गजू कोडगिरवार, प्रकाश पोलचेट्टीवार, अजय पालिवाल, संदीप पोलचेट्टीवार, शिक्षक सुरेंद्र गेडाम, बुचे, सामावार, मुत्यलवार, वैद्य, सोमन्ना रासमवार, संतोष, शंकर, राजू, यमजलवार, वसंत उदकवार यांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा:

आज तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण

नागपूरमध्ये करा लक्झरी फ्लॅट खरेदी

Leave A Reply

Your email address will not be published.