निमनी येथील बोगस लाभार्थी प्रकरणाचा तपास थंडबस्त्यात
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार
सुशील ओझा, झरी: शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून तसेच बोगस कागदपत्रांची पूर्तता करून निमनी येथे रमाई योजनेच्या घरकुलाचा लाभ घेतल्याची तक्रार करण्यात आली होती. याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याने याबाबत सीईओ यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व सभापती यांनी नावापुरते गावात येऊन चौकशी केल्याचा देखावा केला व कोणताही कारवाई केली नाही असा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. अखेर यवतमाळ येथे 2 मार्च ला जाऊन तक्रारकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली.
तालुक्यातील आदिवासी बहुल निमनी गावात फकरू रामदास काटकर नामक व्यक्तीने रमाई घरकुल योजनेचा लाभ घेतला आहे व त्यांचे बांधकाम सुरू आहे. सदर बांधकाम अतिक्रमण करीत रोडच्या हद्दीत सुरू असल्याचे तक्रारीतून म्हटले आहे. फकरू काटकर नामक व्यक्तीचे गावात रहिवासी असल्याचे कागदपत्र नाही शिवाय गावातील मतदार यादीत नाव नाही. तरीपण त्याला घरकुल मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
बोगस घरकुल धारक यांना ग्रामपंचायतच्या काही पदाधिकारी सोबत संगनमत करून संपूर्ण कागदपत्र बोगस तयार केले व रमाई योजनेच्या घरकुलचा लाभ मिळवून देण्यात आल्याची आधी तक्रार करण्यात आली आहे.
बोगस लाभार्थ्याला मदत करणारे पदाधिकारी व लाभार्थ्याची कसून चौकशी करून कार्यवाही करण्यात. अन्यथा अन्यथा पंचायत समिती समोर उपोषणास बसून असा इशारा मोहन कनाके, नरेंद्र वैद्य, सुरेश मिलमीले, राजू पळवेकर, दीपक निब्रड व श्रीराम शेडमाके यांनी निवेदनातून दिला आहे.