व्यावसायिकांनी दर 15 दिवसांनी कोरोची मोफत टेस्ट करावी
मारेगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांचे आवाहन
नागेश रायपुरे, मारेगाव: जिल्हात कोरोना व्हायरसची दुसरी लाट वाढत असल्याने सर्वतोपरी उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरातील सर्व लहान मोठ्या व्यावसायिकांनी दर 15 दिवसांनी शनिवार व रविवारला नगर पंचायत मारेगाव तसेच पुरके शाळेतील कोविड सेंटर येथे मोफत “कोरोना टेस्ट” करावी असे आवाहन मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी केले आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नगर पंचायत मारेगावच्या वतीने विशेष जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये शहरातील सर्व लहान मोठया व्यावसायिकांनी स्वतःहून कोरोना टेस्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कटिंग सलून, भाजीपाला दुकानदार, किराणा दुकानदार आणि त्यांचे कडील कामगार, मेडिकल, व कापड दुकानदार व कामगार, मटन व्यवसायिक, पान टपरी,व आठवडी बाजार वाले किरकोळ विक्रेते, दूध डेअरी, हॉटेल व्यावसायिक, पेट्रोल पंपावरील कामगार सर्व लोडगाडीचालक इत्यादींनी शनिवार आणि रविवार या दोन दिवसांमध्ये नगरपंचायत मारेगाव येथे सकाळी दहा ते दुपारी चार दरम्यान मोफत कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी केले आहे.
कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी टेस्ट गरजेची: अरुण मोकळ
कोरणा विषयक सदर उपक्रमामध्ये सर्व नागरिकांनी उत्साहाने भाग घ्यावा. सामाजिक संस्थांनी स्वतः आणि इतरांना कोरोना टेस्ट करण्यास प्रवृत्त करावे. ज्यांना लक्षणे असतील, त्यांनी आवर्जून टेस्ट करावी. मास्क वापरा, सॅनिटायझरचा उपयोग करा. सामाजिक अंतर पाळा. स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवा.
– अरुण मोकळ, मुख्याधिकारी मारेगाव नगर पंचायत
हे देखील वाचा: