जितेंद्र कोठारी, वणी: मंगळवारी तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळून आलेत. सोमवारी कोरनाचा विस्फोट दिसून आल्यानंतर आज काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील 1 आहे. ग्रामीण भागात शिंदोला येथे 2 तर भांदेवाडा येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 53 झाले आहेत. काल पेक्षा ही संख्या 4 ने कमी झाली आहे. जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी व लॉकडाऊने नवीन नियम लागू केले आहे. यात बाजारपेठेचा वेळ संध्याकाळी 5 पर्यंत राहणार की रात्री 9 पर्यंत याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे.
मंगळवारी दिनांक 16 मार्च रोजी 151 संशयीतांची रॅपिट ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 4 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 147 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 87 व्यक्तींचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. आज यवतमाळ हून एकही रिपोर्ट प्राप्त झाले नाही तर अद्याप यवतमाळहून 426 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. दरम्यान आज 8 कोरोनामुक्त रुग्णांला सुटी देण्यात आली.
सध्या तालुक्यात 53 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 17 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 22 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 14 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाचे एकूण 1321 रुग्ण आढळून आलेत. यातील 1243 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 25 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
बाजारपेठेचा वेळ संध्याकाळी 5 पर्यंत की रात्री 9 पर्यंत?
जिल्हाधिकारी यांच्या नवीन आदेशात बाजारपेठ नियमीत वेळेत सुरू राहणार असल्याचा उल्लेख आल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत बाजारपेठ सुरू राहणार की रात्री 9 पर्यंत याबाबत व्यापारी वर्गासह सर्वसामान्यही द्वीधा मनस्थीत आले आहे. याबाबत ‘वणी बहुगुणी’ने मुख्याधिकारी संदीप माकोडे यांना संपर्क साधला असता त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिक माहिती घेणार असल्याचे सांगितले. मात्र अधिक माहिती येत पर्यंत तुर्तास हा वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
हे देखील वाचा: