सुशील ओझा, झरी: अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शोषण केल्याप्रकरणी तालुक्यातील गणेशपूर (खडकी) येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता ही लॉकडाऊनमध्ये शाळा बंद झाल्याने गावी आली असताना ही घटना घडली. अभिजीत गणपत चांदूरकर (22) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर पोस्कोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, पीडिता ही अल्पवयीन असून ती बाहेरगावी शिक्षण घेते. तिचे आईवडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. गावातच अभिजीत गणपत चांदूरकर (22) हा तरुण गावातच राहतो. एकाच गावातील असल्याने पीडितेची अभिजीत सोबत ओळखी होती. लॉकडाऊनमध्ये शाळा बंद झाल्याने पीडिता गावी आली होती. दरम्यान अभिजीतने पीडितेशी ओळख वाढवत आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
दिनांक 15 मार्च रोजी संध्याकाळी पीडितेच्या घरचे मुकुटबन येथे कामाला गेले होते. आरोपीने तिचे कुटुंबीय कामाला गेल्याचे बघितले. दरम्यान पीडिता घरी एकटीच होती. याची आरोपीला माहिती होती. त्यामुळे रात्री 10 वाजताच्या दरम्यान आरोपीने पीडितेच्या घराचे दार ठोठावले. पीडिताला आई वडील आल्याचे वाटल्याने तिने दरवाजा उघडला. तर बाहेर आरोपी होता. आरोपी लगेच घरात शिरला व त्याने पीडितेला तिच्यावर प्रेम करतो व तिच्याशी लग्न करतो असे आमिष दाखवून संबंध ठेवण्याची मागणी केली. पीडितेने त्याला नकार दिला. मात्र आरोपीने तिच्यावर बळजबरी अत्याचार केला.
एक ते दीड तासांनी पीडितेचे आई वडील घरी आले. कम्पाउंडच्या दाराचा आवाज येताच आरोपीने पीडितेला कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली व तिथून पळून काढला. पीडितेच्या आई वडिलांनी पीडितेला काय झाल्याची विचारपूस केल्यावर पीडितेने सर्व घटनाक्रम तिच्या आई वडिलांना सांगितला.
गेल्या वर्षीही पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप
याआधीही गेल्या वर्षी पीडिता जंगलात शौचास गेली असता आरोपीने तिचा पिछा करत तिला जंगलात गाठले. तसेच तिला दाट जंगलात नेऊन अत्याचार केला, असा आरोपही पीडितेने केला आहे. याबाबत तिने आई वडिलांना सांगितले होते. मात्र बदनामी पोटी त्यांनी पोलिसात तक्रार दिली नाही. मात्र आरोपी कायम पीडितेचा पाठलाग करायचा व घरासमोरून येरझारा घालायचा.
दरम्यान पीडितेने आरोपीला लग्नासाठी विचारले होते. मात्र त्यावर आरोपीने काहीही उत्तर दिले नाही. सोमवारी दुपारी 11 वाजताच्या सुमारास पीडिता तिच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांकडे बाहेरगावी जाण्यास निघाली होती. दरम्यान आरोपी ऍटोस्टँडवर पोहोचला. तिथे त्याने पीडितेला तु दुस-या जातीची असल्याने सांगत लग्न करण्यास नकार दिला व जे करायचे आहे तर अशी धमकी देऊन निघून गेला. या प्रकारामुळे पीडितेचे कुटुंबीय घाबरले व त्यांनी आज पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपी अभिजीत गणपत बांदुरकर (22) राहणार गणेशपूर (खडकी) याच्या विरोधात भादंविच्या कलम 376 (2) (N) 506 यासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा (पोस्को) च्या कलम 3 (1) 3 (2) इ कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार व ठाणेदार धर्मा सोनुने करीत आहे.
हे देखील वाचा: