झरी येथे कृषी कायदे व महागाई विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात आंदोलन

0

सुशील ओझा, झरी: केंद्र सरकारने लादलेले शेतकरी विरोधी कृषी कायद्याविरोधात तसेच पेट्रोल, डिझल, गॅसची दरवाढ व महागाईविरोधात आज देशभरात भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्त झरी येथील तहसिल कार्यालयासमोर काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. दुपारी 11 ते 3 वाजेपर्यंत हे धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार वामनराव कासावार यांनी केले.

विविध संघटनांद्वारे आज दिनांक 26 मार्च रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले. या आंदोलनाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पाठिंबा देत नाना पटोले यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आदेशानुसार आज राज्यभरात कृषी कायदे व महागाई विरोधात धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होत. झरी येथे ही सदर आंदोलन करण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भूमारेड्डी बाजनलावार, बाजार समिती सभापती संदीप बुरेवार, प्रकाश म्याकलवार, निलेश येल्टीवार, राजीव कासावार, हरिदास गुर्जलवार व राहुल दांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदार गिरीश जोशी यांच्या मार्फत देण्यात आले.

यावेळी राजीव आस्वले, मारोती वल्लपकर, प्रदीप बेलखेडे, चेतन म्याकलवार, राकेश गालेवार, बाळू टेकाम, अभिमन्यू बेलखेडे, शंकर आकुलवार, रामराव शेंडे, प्रतीक गंड्रतवार, निखिल चौधरी, श्रीकांत अनमूलवार, नितीन खडसे व काँगेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा:

45 लाखांच्या दरोडा प्रकरणी पोलिसांचे हात रिकामेच

आज तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण, गुरुनगर येथे 2 रुग्ण

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.