झरी तालुक्यातील पोलीस कर्मचारी नक्षल भत्यापासून वंचित

२०१७ पासून मंजूर रक्कम अजूनपर्यंत प्राप्त नाही

0

सुशील ओझा, झरी: शासनाने यवतमाळ जिल्ह्यातील ७ ते ८ तालुक्याला नक्षलग्रस्त तालुका म्हणून २०१७ मध्ये घोषित करण्यात आले. नक्षलग्रस्त घोषित करण्यात आलेल्या तालुक्यातील आरोग्य विभाग, महसूल विभाग,पोलीस विभाग व इतर विभाग असून यातील बहुतांश विभागाना नक्षल भत्ता लागू करण्यात आला आहे. झरी तालुका हा आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे. तालुक्यात पंचायत समिती,तहसील कार्यालय,कृषी कार्यालय, न्यायालय,शासकीय दवाखाना, ट्रेजरी, भूमी अभिलेख कार्यालय, निबंधक कार्यालय, स्कूल,कॉलेज, शिक्षण विभाग,कृषी कार्यालय,आश्रम शाळा,बांधकाम विभाग बँक व इतर कार्यालय असून यात शेकडो अधिकार व कर्मचारी काम करतात. या सर्व कार्यालयातील बहुतांश अधिकारी व कर्मचारी यांना शासनाने लागु केलेले नक्षल भत्ता मिळत आहे.

तालुक्यात मुकुटबन व पाटण दोन पोलीस स्टेशन ये असून दोन्ही ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना नक्षल भत्ता अजूनपर्यंत मिळाला नसल्याने कर्मचाऱ्याच्या प्रचंड नाराजी पसरली आहे.विशेष म्हणजे दोन्ही पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना नक्षल भत्ता मिळत असून कर्मचाऱ्यांना का नाही असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. अधिकारी यांना नक्षल भत्ता मिळत असतांना कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याने असा दुजाभाव का होत आहे असा प्रश्न पोलीस कर्मचारी करीत आहे.

सण २०१७ पासून पोलीस अधिकारी नक्षल भत्ता उचलत आहे परंतु कर्मचाऱ्यांवरच असा अन्याय का केल्या जात आहे. पोलीस कर्मचारी कोणतेही सण आडो क8 इतर बंदोबस्त प्रत्येक ठिकाणी २४ तास ड्युटी करीत असतात.उन्हाळा असो की पावसाळा जनतेच्या सुरक्षेसाठी निस्वार्थ सेवा करताना दिसतात अश्या कर्मचाऱ्यांचा नक्षल भत्ता न दिल्याने पोलीस कर्मचाऱ्यात प्रचंड नाराजी दिसून पडत आहे.

नक्षलग्रस्त तालुका घोषित केल्यानंतर इतर सर्वच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना नक्षल भत्ता मिळत असतांना गेल्या ५ वर्षांपासून पोलीस कर्मचाऱ्यांना नक्षल भत्यापासून वंचित ठेवण्याचे कारण कळू शकले नाही. तरी वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून पोलीस कर्मचाऱ्यांचे थांबलेले नक्षल भत्ता त्वरित काढून द्यावी अशी मागणी पोलीस वर्तुळातून होत आहे.

हे देखील वाचा:

अबब… ! चिंचमंडळ येथे आढळला 28 किलोचा महाकाय मासा

अखेर वृद्ध दाम्पत्याला मिळाले छत, उघड्यावर सुरू होता संसार

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.