वणीतील बस स्थानकजवळ आढळले दोन इसमांचे मृतदेह

एकाच दिवशी दोन मृतदेह आढळल्याने खळबळ

0

विवेक तोटेवार, वणी: गुरुवार 1 एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास दोन मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एक मृतदेह हा बस स्थानक समोरील एका दुकानापुढे आढळून आला आहे. तर दुसरा मृतदेह सिंधी कॉलनी परिसरात आढळून आला आहे.

संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास शहरातील बस स्थानक परिसरात आढळून आलेला मृतदेह एका भिक्षुकाचा आहे.  त्यांचे वय अंदाजे 65 वर्ष आहे. त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान सिंधी कॉलनी परिसरात संदीप भाऊजी खोकले (39) रा. नायगाव (बु) ता. वणी यांचा मृतदेह आढळून आला. यांचा मृत्यू कशाने झाला याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.

संदीप हे आपल्या पत्नीपासून दूर राहत असल्याची माहिती आहे. शिवाय अति मद्य प्राशन केल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रकरणाचा तपास जमादार बुरेवार करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा:

ग्रामीण भागात कोरोनाचे तांडव, भांदेवाड्यात आढळले 10 पॉजिटिव्ह

अबब… ! चिंचमंडळ येथे आढळला 28 किलोचा महाकाय मासा

Leave A Reply

Your email address will not be published.