पुरोगामी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर मुने

राजू तुराणकर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

0

विवेक तोटेवार, वणी: शहरातील पत्रकार सागर मुने यांची पुरोगामी पत्रकार संघ या संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी व विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांनी ही नियुक्ती केली आहे. तर जिल्हाध्यक्षपदी राजू तुराणकर यांची निवड करण्यात आली आहे.

सागर मुने हे टीव्ही मीडिया तसेच डिजिटल मीडियात कार्यरत असून गेल्या अनेक वर्षांपासून ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. पत्रकारांच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. याशिवाय त्यांचा विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमात सक्रीय सहभाग असतो.

पुरोगामी पत्रकार संघटना ही केंद्र सरकारच्या नीती आयोग व महाराष्ट्र शासनाद्वारे मान्यताप्राप्त पत्रकार संघटना आहे. सागर मुने व राजू तुराणकर यांच्या निवडीमुळे पत्रकारिता क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत असून याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा:

वणीतील बस स्थानकजवळ आढळले दोन इसमांचे मृतदेह

श्रुती थाटे मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल, आरोपीला अटक

Leave A Reply

Your email address will not be published.