जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 4 तर ग्रामीण भागात 4 रुग्ण आढळून आलेत. वणी शहरात रविनगर येथे 2, सुराणा ले आऊट व नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला. तर ग्रामीण भागात भालर टाऊनशिप व चिखलगाव येथे प्रत्येकी 1 तर मोहदा व वरोरा येथील 1-1 रुग्ण तालुक्यात पॉजिटिव्ह आले आहे. दरम्यान संशयीतांची टेस्ट घेण्यात अव्वल आहे. अधिकाधिक लोकांची टेस्ट घेणे ही एक दिलासादायक बाब असली तरी यवतमाळहून रिपोर्ट वेळेत येत नसल्याने प्रशासनाच्या कामावर पाणी फिरताना दिसत आहे. अद्याप 975 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
सोमवारी दिनांक 5 एप्रिल रोजी यवतमाळहून एकही रिपोर्ट प्राप्त झाले नाही. आज 298 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 8 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 290 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 213 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 975 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आज 15 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली.
सध्या तालुक्यात 84 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 40 रुग्ण होम आयसोलेट आहेत. तर 44 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. 32 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 1591 रुग्ण आढळून आलेत. यातील 1449 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 26 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
हे देखील वाचा: