झरी तालुक्यात कोरोनाचे 189 ऍक्टिव्ह रुग्ण

पॉझिटिव्ह फिरत आहे मुक्तपणे बाजारात

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जनतेत दहशत निर्माण झाली आहे. तालुक्यातील काही गावातील कोरोना रुग्ण गावात मुक्त संचार करताना दिसत आहे. तर काही रुग्ण आपले व्यवसाय सुरू करून बसले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता बळावली आहे. याबाबत आरोग्य विभागांना माहिती असून त्या रुग्णांना उचलून कोविड सेंटरमध्ये ठेवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Podar School 2025

तालुक्यातील अनेक गावात कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. 25 एप्रिल पर्यंत 189 पॉझिटिव्ह आढळले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून तालुका व गावातील जवळील व्यक्तीचे कोरोनामुळे मृत्यू होत आहे. तसेच सोशल मीडियावर मृतकाचा फोटो टाकून श्रद्धांजली, आदरांजली वाहतांनाचे चित्र पाहून अनेकांच्या मनात धडकी बसत आहे. तालुक्यात कोरोनाने मृत्यू झालेल्याचा आकडा शासन दप्तरी फक्त 4 आहे. परंतु मुकुटबन, पाटण, दुर्भा, दाभा, खरबडा व इतर गावात कोरोनाने जवळपास 20 जणांचे बळी घेतले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे मृतक शहरी व खासगी रुग्णालयात तसेच बाहेर गावी उपचार करत होते. त्यांचा मृत्यू त्याच रुग्णालयात झाल्याने शासन दप्तरी याची नोंद नाही. झरी येथील नगरपंचायत कोविड सेंटर मध्ये 9 व पतन येथील नवीन रुग्णालयात 17 असे एकूण 26 रुग्ण भरती असून 48 रुग्ण बरे होऊन घरी परत गेले आहे.

तालुक्यातील अडकोली, बिरसाईपेठ, चालबर्डी, चिंचघाट, देमाडदेवी, धानोरा दिग्रस, डोंगरगाव, दुर्भा, दुर्गापूर, गणेशपूर( खडकी), घोंसा, हिरापूर, हिवरा बारसा, जामनी, खडकडोह, लिंगती, मांडवा, मांडवी, मार्की, मुकुटबन, आरसीसीपीएएल कंपनी, पांढरकवडा (ल), पाटण-बोरी, सालेभट्टी, शिबला, येडसी व झरी या गावात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

हे देखील वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.