गावागावात तात्काळ विलगीकरण केंद्र निर्माण करा

वंचित बहुजन आघाडीची मागणी, एसडीओ यांना निवेदन

0

पुरुषोत्तम नवघरे, वणी: उपविभागातील ग्रामीण भागात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. यात संपूर्ण मानव जात धोक्यात आली आहे. त्यांना वाचविण्यासाठी महसूल प्रशासनाने गाव तिथे विलगीकरण केंद्र ही संकल्पना राबवावी. जेणेकरून कोविडचा प्रसार थांबविण्यासाठी मदत होईल अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना एका निवेदनातून केली आहे.

वणी, मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. मोहदा, निळापूर, भालर वसाहत, निवली, नांदेपेरा, राजूर, उकणी, सुंदरनगर, नेरड, मूर्धोनी, केसुर्ली, लालगुडा तसेच मारेगाव टाळक्यात अनेक गावात कोरोना बाधीत रुग्ण आढळून येत आहे. बाधीत रुग्णांमुळेच त्यांच्या संपर्कातील व्यक्ती बाधीत होत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. कोवीड रुग्णात लक्षणॆ दिसताच जागेवरच चाचणी करून औषध उपचार केल्यास रुग्ण लवकर बरा होतो. प्रथम अवस्थेत उपचार करणे गरजेचे आहे

निवेदनात म्हटले आहे की गावातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडीचा विलगीकरण केंद्रासाठी उपयोग करावा. तर रुग्णाची देखभाल गावातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सेवक, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत शिपाई, कोतवाल व गावातील होतकरू तरुण, सरपंच, सदस्य युवा मंडळ, यांच्या मदतीने करता येईल. त्या सोबतच रुग्णाच्या आरोग्य विषयक देखभालीसाठी गावातील, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, नर्स (NM) तसेच परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर यांची नेमणूक करुन आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा गावात भेट देऊन रुग्णाची परिस्थिती कशी आहे याबाबत मार्गदर्शन करुन औषधोपचार केल्यास रुग्णवाढीला निश्चितच आळा बसेल.

विलगीकरण केंद्रातील रुग्णांना घरचे जेवण, झोपण्याची व्यवस्था स्वतः करता येईल, व त्यांची खासगी रुग्णालयातील आर्थिक पिळवणूक थांबेल. निवेदनावर दिलीप भोयर, मंगल तेलंग, मिलिंद पाटील, एड. विप्लव तेलतुंबडे, रवी कांबळे, सतीश मेश्राम, किशोर मून, यांच्या सह्या आहेत.

हे देखील वाचा:

पतसंस्थेची 97 लाखांने फसवणूक, वणीतील दाम्पत्यावर गुन्हा दाखल

सॅनिटायझर प्यायल्याने वणीत आणखी एकाचा मृत्यू

Leave A Reply

Your email address will not be published.