जब्बार चीनी, वणी: आजचा दिवस वणी तालुक्यासाठी अत्यंत दिलासादायक ठरला. आज तब्बल 137 रुग्णा कोरोनामुक्त तर झालेत शिवाय रुग्णसंख्येचा दर ही आज कमी होता. आज यवतमाळहून प्राप्त झालेल्या 170 पैकी अवघे 7 रुग्ण पॉझिटिव्ह आलेत. आजतालुक्यात एकूण 40 रुग्ण पॉझिटिव्ह आलेत. यात वणी शहरातील 7 रुग्ण तर ग्रामीण भागातील 32 रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय एक रुग्ण इतर ठिकाणचा आहे. आज 6 रुग्णांचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल. यातील शासकीय रुग्णालयात 72, 65, 55 वर्षीय महिलेचा तर एका 46 वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 65 वर्षीय पुरुष व 85 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
वणी शहरात आलेल्या 7 रुग्णांमध्ये आंबेडकर चौक येथे 2 तर लक्ष्मी नगर, सिंधी कॉलनी, साईमंदिर, जत्रा रोड, शिवाजी चौक येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. तर ग्रामीण भागात शिरपूर येथे सर्वाधिक 7 रुग्ण आढळलेत. याखाली कायर येथे 4 रुग्ण तर गणेशपूर, राजूर, वारगाव, शेलू (शिरपूर), वागदरा, सावर्ला येथे प्रत्येकी 2 रुग्ण तर मुंगोली खाण, नांदेपेरा, लालगुडा, मंदर, बोरगाव, कुरई, झरपट, बोर्ड येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. तर दरा येथे एक रुग्ण आढळला आहे.
आज यवतमाळहून 170 अहवाल यवतमाळहून प्राप्त झाले आहेत. यात अवघे 7 रुग्ण पॉझिटिव्ह तर 163 निगेटिव्ह आले आहेत. याशिवाय आज 201 व्यक्तींच्या रॅपिड ऍन्टीजन टेस्ट घेण्यात आली. यात 33 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यात. आज आलेल्या रुग्णांवरून 364 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 1497 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आज तालुक्यात 137 कोरोनामुक्त रुग्णांना सुटी देण्यात आली आहे.
सध्या तालुक्यात 593 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 44 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 522 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 27 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 3034 रुग्ण आढळून आलेत. यातील 2391 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 50 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
हे देखील वाचा: