जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंखाखू, सुगंधी सुपारीची विक्री करण्यावर कायदेशीर बंदी असली तरी छुप्या मार्गाने त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. शहर पोलीस डीबी पथकाने वणी बस स्थानाकासमोर एका पान सेंटर दुकानांवर छापा टाकून 50 हजारांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी अन्न व औषध निरीक्षक यवतमाळ यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तंबाखू विक्रेत्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी व्यापारी श्रीधर फेरवानी यास अटक करण्यात आली आहे. तर 4 आरोपी फरार आहे.
प्राप्त माहितीनुसार ठाणेदार वैभव जाधव यांना बस स्थानक परिसरात एका दुकानातून प्रतिबंधित तंबाखू व सुपारीची ठोकमध्ये विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीवरून डीबी पथक प्रमुख पीएसआय गोपाल जाधव व पथकाने गुरुवार 6 मे रोजी सकाळी 10 वाजता दरम्यान बस स्थानाकासमोरील शिशमहल पान सेंटर या दुकानावर छापा टाकला. दुकानाच्या मागील गल्लीत असलेल्या गोडाऊनची तपासणी केली.
पोलिसांना मजा 108 शिशा हुक्का झेन 14 टिन (किंमत 10750 रु) , रितीक क्लासिक गोल्ड सुगंधित सुपारी 26 पॅकेट किंमत 1560, ऍनी गोल्ड सुगंधित सुपारी 60 पॅकेट किंमत 31440 रु., विमल पान मसाला 35 पॅकेट किंमत 4200 व व्ही वन बिजी तंबाखू पाऊच 35 किंमत 1050 रुपये असे एकूण 48820 रुपयांचा माल आढळला पोलिसांनी दुकान मालकाचे घर व इतर ठिकाणीही झडती घेतली. मात्र अधिकचे माल आढळले नाही.
तंबाखु जप्तीची कार्यवाही नंतर अन्न व औषध प्रशासन अधिकारी यवतमाळ यांना सूचना देऊन पाचारण करण्यात आले. अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन यवतमाळ संदीप एकनाथ सूर्यवंशी यांची फिर्यादवरून गैरकायदेशीर तंबाखू विक्री करणारे व्यापारी श्रीधर बसकराम फेरवानी (48) रा. सिंधी कॉलनी वणी विरुद्द महाराष्ट्र राज्य अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 तसेच नियम व नियमन 2011 चे कलम 26 (2), 27, 23 सहकलम 30 (2) (अ)चे उल्लंघन तसेच कलम 188, 269, 270, 272, 273, 328 भा.द.वि. अनव्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे. तर इतर 4 आरोपीचे शोध पोलीस घेत आहे.
प्रतिबंधित तसेच बनावट तंबाखू व सुपारी विक्रेत्यांविरुद्द शहर पोलिसांची यावर्षी तिसरी मोठी कार्यवाही आहे. सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उओ विभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार, पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गोपाल जाधव, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दिपक वांडर्सवार यांनी केली.
हे देखील वाचा: